पी. चिदंबरम यांना ईडीकडून अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. त्यापूर्वी चौकशी पथकातील तीन अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्यांची चौकशी केली. आत्तापर्यंत चिदंबरम यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. दिल्ली न्यायालयाला ही माहिती देण्यात आली असून चिदंबरम यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

 

दिल्ली विशेष न्यायालयाने कॉंग्रेस नेते चिदंबरम यांच्याविरोधात व्यक्तिगत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी ते या न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत. मंगळवारी तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या चौकशीची परवानगी देण्यात आली. न्यायालयाने चौकशी अधिकाऱ्यांना त्यांना अटक करण्याचीही परवानगी दिली आहे. दरम्यान, कार्ती चिदंबरम आणि चिदंबरम यांची पत्नी तिहार तुरुंगात पोहोचली होती. त्यांनी वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

@@AUTHORINFO_V1@@