‘कुछ कुछ होता है’ म्हणता म्हणता २१ वर्ष सरली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |



सोशल मीडिया आणि वेब सीरिजच्या काळात आजकाल सगळेजण नेटफ्लिक्स अँड चिल अशा जगात असले तरी बॉलिवूडमधील काही सिनेमे हे अजरामर आहेत. काळ कितीही पुढे गेला
, लोक कितीही पुढारले तरी हे चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण केलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट. विश्वास बसत नाही पण आज या चित्रपटाला तब्बल २१ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे.

गेली २१ वर्ष या चित्रपटाने खूप वेगवेगळ्या पिढ्या आणि प्रेक्षकांना एन्टरटेन केले आहे. प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. याचे संपूर्ण श्रेय करण जोहर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाते. हा चित्रपट करायचा असे जेव्हा निश्चित झाले तेव्हा शाह रुख खान बऱ्यापैकी नावारूपाला आला होता, शिवाय राणी मुखर्जी आणि करण जोहर ची जिवलग मैत्रीण काजोल सुद्धा. मात्र करण जोहरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. पण तरीही आपल्या मित्राच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन त्यांनी हा चित्रपट केला आणि तो इतका सुपरहिट होईल याचा कोणी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. त्यात फारा खान, मनीष मल्होत्रा या नंतर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकारांनी सुद्धा या चित्रपटात कॅमिओ रोल केले. इतकेच काय तर करण जोहरची आई हिरु जोहर यांनी सुद्धा चित्रपटात एका छोटे पात्र साकारले.

शाह रुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल, सलमान व्यतिरिक्त चित्रपटामध्ये सना सैद, रीमा लागू, फरीदा जलाल,अर्चना पुरणसिंह, अनुपम खेर, हिमानी शिवपुरी अशा दिग्गज कलाकारांमुळे चित्रपटाला अधिकच रंगात आली. अर्थातच एवढ्या सगळ्या हुशार आणि प्रतिभावान लोकांच्या प्रयत्नांमुळे चित्रपट इतका यशस्वी झाला कि पिढ्या दर पिढ्या हा आता एक चित्रपट नसून प्रेक्षकांसाठी त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग बनला आहे असे कोणी म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात पण भारतात चित्रपटांना त्याहीपेक्षा जास्त महत्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळे दिले जाते. अक्षरशः चित्रपटांमुळे ट्रेंड सुद्धा बदलतो इतकी ताकद या माध्यमामध्ये आहे. 'कुछ कुछ होता है' चा काळ म्हणजे चित्रपटांचा एक सुवर्णकाळच म्हणावा लागेल. त्यामुळे आजही प्रेक्षक 'कुछ कुछ होता है' च्या आठवणीतून बाहेर पडलेले नाहीत आणि आपल्या आयुष्यात सुद्धा कोणी 'राहुल' किंवा 'अंजली' सापडतात का या शोधत असताना दिसतात.

मागील वर्षीच्या कार्यक्रमाची ही लिंक जरूर पहा...

@@AUTHORINFO_V1@@