काश्मीरमधील फोनसेवा पूर्ववत; परंतु एसएमएस सेवा बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |




श्रीनगर
: कलम ३७० रद्द केल्यांनतर संरक्षणाच्या कारणावरून बंद असलेली फोनसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीनगर बीएसएनएल कार्यालयात पोस्टपेड सिम खरेदी करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील लोक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. सरकारने सोमवारी काश्मीर खोऱ्यातील बीएसएनएल पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू केली. त्यानंतर प्री पेड यूजर्स नवीन पोस्ट पेड सिम खरेदी करण्यासाठी बीएसएनएल कार्यालयात येऊ लागले. पोस्टपेड सेवा सुरू करण्याच्या घोषणेनंतर लगेचच बीएसएनएल कार्यालयात स्थानिक लोकांची लांबलचक रांग दिसली. जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुरुवातीपासूनच शांत राहिले आहे
, त्या दृष्टीने सरकार हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवित आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, केवळ काही विशिष्ट क्षेत्रांवर बंदी आहे. यात एसएमएस सेवा बंद करण्यात आली. आज झालेल्या हल्याच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.



काश्मीर खोऱ्यात ६६ लाख मोबाइल फोन
, त्यापैकी ४० लाख पोस्टपेड युजर्स


काश्मीरमधील १० जिल्ह्यात एकूण ६६ लाख मोबाइल फोन आहेत. त्यापैकी ४० लाख मोबाइल फोनमध्ये पोस्टपेड सिम आहे. २६ लाख लोकांकडे प्री-पेड सिम आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून प्रशासनाने केवळ पोस्ट पेड सिमची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्री पेड सिम असलेले ग्राहक पोस्ट पेड सिम घेण्यासाठी श्रीनगर बीएसएनएल कार्यालयात जात आहेत. मात्र
, बीएसएनएल कार्यालयात गर्दीमुळे लोकांना सिम घेण्यासाठी विलंब होईल अशी माहिती बीएसएनएलकडून मिळते.

@@AUTHORINFO_V1@@