'फेसबुक ट्रोलर'ची रवानगी पोलीस कोठडीत करणारे न्यायाधीश अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



कर्नाटक उच्च न्यायालय करणार चौकशी,
गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे संकेत


(बंगळूर): जनता दल सेक्युलर या पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा तसेच एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात फेसबुकवर अपमानजनक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. 'ट्रोल मागा' या फेसबुक पेजावरून संबंधित मजकूर टाकण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी, हे फेसबुक पेज चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला . जयकांत एस. असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी धार्मिक भावना भडकवणे, दंगल भडकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल झाले तेव्हा कर्नाटकात कुमारस्वामींचे सरकार होते.


जयकांत यांनी जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला होता. पोलिसांनी याविषयीचा गुन्हा २६ मे २०१९ रोजी याविषयीचा गुन्हा दाखल केला होता. जयकांत यांनी त्यानंतर जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेतला. अटकपूर्व जामिनातील अटींनुसार जयकांत पोलीस ठाण्यात गेले असता; पोलिसांनी जामिनाच्या अनुषंगाने कोणतेही सहकार्य केले नाही.

जून २०१९ मध्ये पुन्हा जयकांत यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याकरिता दुसरा गुन्हा दाखल केला. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने जयकांत यांचा जामीनअर्जदेखील फेटाळला होता. जयकांत यांनी यासगळ्या प्रकाराविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबत पोलीस प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विविध न्यायनिर्णयात दिलेल्या मार्गदर्शक निर्देशाचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षणदेखील उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच जामीनअर्ज नाकारणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाविरोधात चौकशी करणार असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जयकांत यांच्याविरोधातील सर्व गुन्हे ११ ऑक्टोबर रोजीच्या आदेशाने रद्दबातल ठरवण्यात आले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@