भाजपच्या जाहीरनाम्यात नेमके आहे काय ? वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |
 
 

संपन्न, समृद्ध-समर्थ महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प : मुख्यमंत्री



 

मुंबई : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बहुप्रतिक्षित असा जाहीर नामा मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आला. यावेळी संपन्न, समृद्ध-समर्थ महाराष्ट्र घडवण्याच संकल्प आम्ही सोडत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामध्ये शेती, रोजगार, आर्थिक विकास, सुरक्षितता, आरोग्य, जनकल्याण, जलवाहतूक, रेल्वे व रस्ते विकास, दुष्काळमुक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आदींसह सिंचन व पाणीपुरवठा योजनांवर भर देण्यात आला.

 

भाजप कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विजयगीताचेही अनावरण करण्यात आले.

 

वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा तसेच १००० मेगावॅटचे पवन ऊर्जा आणि १५०० मेगा वॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम सामाविष्ठ करणे, राज्यात नव्या IIT, IIM, AIIMS या उच्च शिक्षण संस्था उभारणे, औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणी आदी घोषणा करण्यात आल्या.

 

आर्थिक विकास महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये एकूण पाच आयटीपार्क उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नॉलॉजी पार्क, कंत्राटी कामगारांसाठी लवादा, धनगर समाजाला १००० कोटींचे विशेष पॅकेज, अनुसुचित जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर, अनुसुचित जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा आदी कल्याणकारी घोषणा यावेळी करण्यात आल्या.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्नसाठी प्रयत्न करणार असल्याचीही घोषणा संकल्पपत्रात केली आहे. सुरक्षित महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रमुख शहरात सीसीटीव्हीचे कवच उभारण्यात असून अपराध सिद्धतेबाबत सुधारणा करणार, पोलीस खात्याचे काम अधिक प्रभावी केले जाणार आहे.

 

आरोग्य क्षेत्राला उभारी

दोन वर्षात महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करणार असल्याचाही संकल्प भाजपतर्फे करण्यात आला. १५,००० अद्ययावत आरोग्य केंद्रे, प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार व्यवस्था, महिला आर्थिक विकासात ५० टक्के भागीदारी, बालसंगोपन सुविधांमध्ये तीन पट वाढ करणार, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन, स्त्री-पुरुष समानता या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणार, गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा संरक्षण, मासेमारीसाठी कमी दरात कर्ज व विक्रीसाठी आधुनिक सुविधा तसेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न, सरकारच्या विविध योजना प्रभाविपणे राबवणार, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपतर्फे यावेळी देण्यात आले.

 
@@AUTHORINFO_V1@@