बीसीसीआयच्या 'दादा'गिरीवर कौतुकांचा वर्षाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या क्रिकेट बोर्डाच्या खुर्चीवर 'सौरव दादा' आसनस्थ होणार असल्यामुळे सर्व क्रीडाप्रेमी खुश आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड निश्चित झाली आहे. यामुळे सर्व स्तरांमधून त्र्याचे कौतुक होत आहे. गेले काही वर्ष बीसीसीआयची प्रतिमा काहीशी बिघडली असल्यामुळे त्याच्या निवडीमुळे बीसीसीआयला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला की, "बीसीसीआयच्या अध्यक्षपदी दादाची निवड होणे हे भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटचा चेहरा मानसिकता बदलामध्ये सौरव गांगुलीचा खारीचा वाटा आहे. सौरव गांगुली एक उत्तम लीडर आहे. तसेच, त्याच्या क्रिकेटच्या बुद्धिमत्तेचा फायदादेखील भारतीय क्रिकेटसाठी फलदायी आहे."

 
 
 

भारतीय क्रिकेटमधील त्याचा सर्वात जवळचा सवंगडी आणि तडाखेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाघनेदेखील त्याचे कौतुक केले. "दादा, देर है, पर अंधेर नहीं....भारतीय क्रिकेटसाठी हे शुभ संकेत आहेत." असे ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या.

  
 
 

भारतीय क्रिकेटमध्ये तरुण खेळाडूंना संधी देणारा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे. त्याच्या कॅप्टनशिपमध्ये उदयास आलेला माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेदेखील ट्विटकरून दादाला शुभेच्छा दिल्या. " माजी क्रिकेटपटू ते बीसीसीआयचे अध्यक्ष...दादा तुम्हाला शुभेच्छा...भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले संकेत आहेत. एक सर्वोत्तम कर्णधार आता बीसीसीआयची धुरा सांभाळणार आहे. आता प्रयोगशील आणि आवश्यक गोष्टी होतील अशी अपेक्षा आहे." असे त्याने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 
 
 

सौरव गांगुलीसोबत क्रिकेटपासून कॉमेंटरीपर्यंत काम करत असलेला माजी क्रिकेटपटू लक्ष्मण यानेही त्याच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विटद्वारे शेअर केला आहे. "बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा...तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट समृद्ध होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नव्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा." असे त्याने म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@