भारतीय महिला कर्तृत्वाची जगभरात चर्चा ; पंतप्रधानांनी केले कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



हरियाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या चरखी दादरी येथे मंगळवारी निवडणूक सभेला संबोधित केले. येथे त्यांनी बबिता फौगाट यांच्या समर्थनार्थ जनतेला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, "हरियाणामध्ये 'म्हारी छोरी छोरों से कम हैं के' ही मोहीम एक अभियान झाली आहे. अशी चळवळ सुरू झाल्याने जगाला असे म्हणायला भाग पाडले की भारताच्या मुली 'धाकड' आहेत."

 

"चीनचे शी जिनपिंग यांना हरियाणाती मुलींची कथा असलेल्या 'दंगल' चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाचे कौतुक ऐकून मला हरियाणाचा खूप अभिमान वाटला," असे मत मोदींनी व्यक्त केले. 'बेटी बचावो, बेटी पढाओ' अभियानाला हरियाणातील खेड्यांनी प्रतिसाद दिला नसता तर त्याची फळ आज मिळाली नसते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

 

...तर पाकड्यांचे पाणी थांबवून ते हरियाणातील शेतकऱ्यांना मिळेल : पंतप्रधान

 

"हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे. मी ते पाणी भारतात अडवून हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणार आहे. या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा हक्क आहे." असे संबोधन पंतप्रधानांनी यावेळी केले.

@@AUTHORINFO_V1@@