पाकिस्तानला एफएटीएफचा झटका; 'डार्क ग्रे' यादीत समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |


 

 

पॅरिस : यापूर्वीच एफएटीएफच्या करड्या यादीत असणाऱ्या पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. पॅरिस याठिकाणी होत असलेल्या एफएटीएफच्या बैठकीत पाकिस्तानला कोणत्याही देशाचा पाठिंबा मिळालेला नाही. पाकिस्तान आधीपासूनच 'ग्रे' यादीमध्ये आहे, आता मात्र पाकिस्तानला 'डार्क ग्रे' यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. एफएटीएफबाबत पाकिस्तानचा निर्णय १८ ऑक्टोबरला घेण्यात येईल असे सांगितले.


दहशतवादी निधी व पैशांची उधळपट्टी रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानने अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांविरूद्ध ठोस पावले न उचलल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे . पाकिस्तानच्या सद्य स्थितीवर असेही मानले जाते की
,"अंतिम निर्णयामध्येही एफएटीएफचे सर्व देश पाकिस्तानच्या विरोधात जाऊ शकतात, कारण दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईत पाकिस्तान फारसे कठोर पावले उचलत नाही. म्हणूनच पाकिस्तानला 'डार्क ग्रे लिस्ट' मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.


एफएटीएफ बैठकीत पाकिस्तान एक डॉझियर सोपवणार आहे
, ज्यामध्ये इस्लामाबादने दहशतवाद्यांविरूद्ध काय कारवाई केली याचा उल्लेख केला जाईल. दहशतवादी निधी आणि मनी लॉन्ड्रिंगविरोधात कारवाई याबद्दलची माहितीही डॉझीयरने पुरविणे अपेक्षित आहे. पाकिस्तानने जवळजवळ प्रत्येक सदस्य देशाकडे जाऊन काळ्या यादीत टाकू नये यासाठी पाठिंबा मागितला. पाकिस्तानला चीन, तुर्की आणि मलेशिया देशांकडून मदतीची अपेक्षा असली तरी या तिन्ही देशांनीही पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला नाही. जून २०१८ मध्ये पाकिस्तानला 'ग्रे' यादीत टाकण्यात आले. याबाबत एक समिती स्थापन करून अहवाल मागविण्यात आला. यामध्ये बँकिंग आणि बिगर-बँकिंग, कॉर्पोरेट आणि बिगर-कॉर्पोरेट क्षेत्रातील दहशतवादी संघटनांचे पैशाची देवाण-घेवाण आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्यासाठीच्या उपायांचा समावेश होता.


एफएटीएफच्या नियमांनुसार
, राखाडी, गडद राखाडी या काळ्या याद्यांमधील श्रेणी असते. 'डार्क ग्रे' म्हणजे कठोर चेतावणी, जेणेकरून संबंधित देशाला सुधारण्याची शेवटची संधी मिळेल. असे झाल्यास, शेवटच्या संधींमध्ये स्वतःला सुधारण्यासाठी हा पाकिस्तानला शेवटची संधी असेल, अन्यथा त्यास काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.

@@AUTHORINFO_V1@@