स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे भारताला सर्वोच्च स्थानी न्या : संरक्षणमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : 'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे भारताला या आघाडी क्षेत्रात आघाडीवर न्या, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. डीआरडीओच्या ४१ व्या वार्षिक संमेलनादरम्यान ते बोलत होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व आणि भारताचे सशक्तीकरण या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

ते म्हणाले, "तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर झपाट्याने बदल होत आहेत. संरक्षण क्षेत्रात कमी खर्चात जास्तीत जास्त सुरक्षित अशा साधन सामग्रीची गरज आहे. जागतिक पातळीवरील संसाधने आणि भारतीय संसाधनांची उपलब्धता ही दरी भरून निघायला हवी."
 

लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले, "डीआरडीओच्या सहाय्याने देशात लागणाऱ्या सर्व संरक्षण क्षेत्रातील क्षेपणास्त्रांची पूर्तता देशातच पूर्ण होतील, असा प्रयत्न सुरू आहे. युद्धाची गरज पडेल त्यावेळेस भारताकडे अत्याधुनिक यंत्रणा भारताकडे असेल."

@@AUTHORINFO_V1@@