कोल्हापूरात पूर आला त्यावेळी राज ठाकरे कुठे होते : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : कोल्हापूरात पूर आला त्यावेळी मी पूरग्रस्तांच्या पूर्नवसनासाठी दिवसरात्र प्रयत्न करत होतो. पाच लाखहून अधिक लोकांचे स्थलांतर मी केले. त्यावेळी राज ठाकरे होते कुठे, असा सवाल महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विचारला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी घेतला.

 

कोथरुडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर भाजप संकल्पपत्र प्रकाशन कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसेच शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्यांनी आमच्या कामाबद्दल संशय व्यक्त करू नये, असा खरपूस समाचारही त्यांनी घेतला.

 

कोल्हापूरात पूरस्थिती दरम्यान मी स्वतः इथे उपस्थित राहुन पाच लाख नागरिकांचे पूर्नवसन केले. शासनाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी हवी ती सर्वोतोपरी मदत आम्ही पोहोचवली मात्र, राज ठाकरे या भागात फिरकलेही नाही, असा टोला त्यांनी लगावला.




@@AUTHORINFO_V1@@