स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार : भाजपचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |




मुंबई : भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसदर्भात संकल्पपत्राची घोषणा झाली आहे. सर्वसामावेशक अशा संकल्पपत्रात एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, यासाठी नवे राज्य सरकार पाठपुरावा करेल, अशी घोषणा भाजपतर्फे संकल्पपत्रात करण्यात आली आहे.



 

 

तसेच, स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासाठी हा पुरस्कार मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात देण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बहुप्रतिक्षित असा जाहीर नामा मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आला. यावेळी संपन्न, समृद्ध-समर्थ महाराष्ट्र घडवण्याच संकल्प आम्ही सोडत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामध्ये शेती, रोजगार, आर्थिक विकास, सुरक्षितता, आरोग्य, जनकल्याण, जलवाहतूक, रेल्वे व रस्ते विकास, दुष्काळमुक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आदींसह सिंचन व पाणीपुरवठा योजनांवर भर देण्यात आला.



 





@@AUTHORINFO_V1@@