ऐतिहासिक वारसा लाभलेली 'आमची मुंबई'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019   
Total Views |

 

 
मुंबईतील फ्लोरा फाऊंटन, अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि नेसेट एलियाहू सिनेगॉग या तीन पुरातन वास्तूंची नुकतीच 'युनेस्को'नेही दखल घेतली आहे. 'युनेस्को'चा एशिया-पॅसिफिक पुरस्कार या मुंबईतील तीन स्थळांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबईची सद्यस्थिती आणि इतरही ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या प्रमुख स्थळांचा घेतलेला हा आढावा.
 

वाहतूककोंडी आणि त्यामुळे वाहनचालकांचा, प्रवाशांचा होणारा खोळंबा मुख्यत्वेकरून खालील तीन समस्यांमुळे उद्भवतो व त्याकरिता मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी या सर्व समस्या सोडविण्याचे मनावर घेतल्याचे दिसते.

 

पहिली समस्या - रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष देऊन पावसाळ्यात कोल्डमिक्स वा इतर वेळी हॉटमिक्स वापरून खड्ड्यांच्या समस्या दूर होतील. त्याशिवाय जास्तीत जास्त रस्ते काँक्रीटचे बनविणे हा दुसरा उपाय असू शकतो. रस्ता बांधताना वा दुरुस्त करताना कंत्राटदारांच्या कामाकडे जास्त लक्ष पुरविले जाईल.

 

दुसरी समस्या - मोकळ्या रस्त्यांवर नि:शुल्क चारचाकी व दुचाकी खाजगी वाहने पार्क केलेली असणे. पालिका आयुक्तांनी यापुढे अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर जबर दंड ठोठावण्याची शिक्षा देण्याचे ठरविले आहे. असे केल्यावर रस्ते सार्वजनिक 'बेस्ट' बसकरिता मोकळे होणार आहेत. वाहतूककोंडी कमी होईल.

 

तिसरी समस्या - पदपथावर व थोड्या प्रमाणात रस्त्यावरही छोट्या दुकानांनी वा फेरीवाल्यांनी जागा व्यापणे. या समस्येबद्दलही पालिका लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे समजते. रस्त्याखालून जाणाऱ्या सेवावाहिन्यांकरिताही एक निश्चित धोरण निर्धारित करणे अपेक्षित आहे. बहुदा 'डक' बांधणे हा त्यावरील एक उपाय समोर आला आहे. या 'डक'मुळे वारंवार रस्ता खोदावा लागणार नाही. या उपायात मात्र शास्त्रीय पद्धतीने रस्त्याचे नियोजन करणे जरुरी ठरेल. पर्जन्यजलवाहिन्यांचा आकार मोठा असतो. त्यामुळे त्या 'डक'मध्ये जाऊ शकणार नाही व त्या नियमितपणे स्वच्छ ठेवायला लागतील.

 

मुंबईतील आर्थिक दर्जा, स्वच्छता इत्यादी बाबतीत आंतरराष्ट्रीय संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणातूनमुंबईविषयीच्या खालील काही बाबी प्रकर्षाने समोर येतात.

 

. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील पहिल्या ३० शहरसंचात पोहोचली आहे. हे सर्वेक्षण 'जीएलएल जर्मनी' यांच्या जगातील १३०० शहरांकरिता २०१८ मध्ये केले गेले आहे. या सर्वेक्षणात लोकसंख्या, हवाई प्रवासी, व्यवसायाकरिता केंद्रे, इमारती बांधण्यात गुंतवणूक, शहराबाहेर गुंतवणूक, बांधकामाचा किरकोळ खर्च, व्यावसायिक नोकरवर्ग, जीडीपी इ. मुद्दे विचारात घेण्यात आले.

 

. शहरी संपत्तीबद्दल 'नाईट फ्रँक'नी २०१९ साली सर्वेक्षण केले. त्यात लंडन प्रथम स्थानावर, मुंबई १२व्या स्थानावर (२०१७ मध्ये मुंबई १८ व्या स्थानावर होती.) वैयक्तिक संपत्तीचे प्रमाण २२५ कोटी वा अधिक धरून मुंबईत ७९७, दिल्लीत २११, बंगळुरुत ९८ कोटी आहेत. देशातील ११९ अब्जाधिपतींमध्ये बंगळुरूमध्ये ३३, मुंबईत १९, दिल्लीला ८ व इतर अन्य शहरांत आढळून आले.

 

. निवासी घर महागाईच्या काळात विकत घेण्याबाबत जगभरात मुंबई १६व्या स्थानावर, दिल्ली ५५ व बंगळुरू ५६व्या स्थानावर आहे. फिलिपिन्समधील मनीला शहर प्रथम स्थानी, स्कॉटलंडमधील एडिनबरो दुसऱ्या स्थानावर व बर्लिन, म्युनिच तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आले आहेत. हे सर्वेक्षण 'नाईट फ्रँक' यांनी २०१९ मध्ये केले.

 

. देशाच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई शहर २०१६ मध्ये दहाव्या, २०१७ मध्ये २९व्या व २०१८ मध्ये १८व्या स्थानी होते. त्यामुळे मुंबईत स्वच्छतेची कामे अधिक वेगाने हाती घ्यायला हवी.

 

मुंबईतील ऐतिहासिक वास्तू

फ्लोरा फाऊंटन

 

 

या कारंज्याचा उल्लेख संपूर्ण भारतातील वारसा रचनेच्या यादीमध्ये आढळतो. वेस्टर्न इंडियाच्या अ‍ॅग्री-फलोत्पादक संस्थेने १८६४ मध्ये हे कारंजे बांधले. त्याचे नाव 'फ्लोरा-रोमन देवी ऑफ फ्लावर्स' असे ठेवले गेले. १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीसाठी आपल्या बलिदान देणाऱ्या १०५ जणांच्या स्मरणार्थ 'फ्लोरा फाऊंटन'चे नामकरण 'हुतात्मा चौक असे करण्यात आले. हे 'फ्लोरा फाऊंटन' आज ज्या ठिकाणी आहे, तिथे पूर्वी बॉम्बे फोर्टचे मूळ चर्चगेट होते. पांढऱ्या रंगाच्या कोटिंगसह बारीक पोर्टलँड दगड वापरून त्यावर मूर्ती तयार केली गेली होती. मुकुट घातलेली रोमन देवीची भव्य मूर्ती या कारंजाच्या स्थापत्त्य सौंदर्यात भर घालते. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा 'फ्लोरा फाऊंटन' दिव्यांच्या झगमगटाने अगदी उजळून निघते. अलीकडेच मुंबई पालिकेने त्याचे नूतनीकरण केले आहे.

 

मरिन ड्राईव्ह

 
 
 

अधिकृतपणे या भागाला 'नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग' म्हणून ओळखले जाते. हा मार्ग नरिमन पॉईंट ते मलबार हिलपर्यंत एकूण तीन किलोमीटर लांबीचा. अरबी समुद्राच्या किनाऱ्यासह दक्षिणेकडील मुंबईत हा सहा मार्गिकांचा रस्ता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीमंत अशा पारशी समाजाने बांधलेल्या आर्ट डेको इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. हा 'मरिन ड्राईव्ह' भाग रात्रीच्या प्रकाशात राणीच्या गळ्यातील हारासारखा चमकदार दिसतो. म्हणूनच त्याला 'क्विन्स नेकलेस' म्हणून संबोधले जाते. शहरातील सर्वाधिक सधन वस्तीच्या क्षेत्रामध्ये हा भाग गणला जातो. या भागात बऱ्याच उच्च दर्जाची हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. 'मरिन ड्राईव्ह'च्या उत्तरेकडे लोकप्रिय चौपाटी आहे. जगातील सर्वात मोठ्या दृश्यांची गॅलरी म्हणून गणले जाणारे 'मरिन ड्राईव्ह' क्षेत्र हे दरवर्षी लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरते.

 

मुंबईची शान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

 

 
 

या इमारतीमध्ये दगडांचे घुमट, टोकदार कमानी, सुंदर बुरे आणि विलक्षण योजना असून यामुळे या वास्तूकडे बघणारी व्यक्ती आश्चर्यचकित नाही झाली तरच नवल. डागलेल्या काचेच्या खिडक्या टर्मिनसच्या प्रभावी फॅलेडची उत्कृष्टता वाढवतात. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही गाड्यांचे असे हे दिमाखात उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

 

गेट वे ऑफ इंडिया

 

'गेट वे ऑफ इंडिया'ला केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक प्रतीकाचे चिन्ह बनले आहे. शहराच्या दक्षिणेकडील भागात, गेट-वेने भव्य अरबी समुद्राकडे पाहिले आहे. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीचे स्मारक म्हणून या भव्य वास्तूचे बांधकाम करण्यात आले होते. जॉर्ज विटेट यांनी याची रचना केली होती आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला होता. दि. ४ डिसेंबर, १९२४ रोजी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. निर्दोष इंडो-सारासेनिक आर्किटेक्चर उपयोगात आणून ही रचना पिवळ्या रंगाच्या बेसाल्ट दगडामध्ये बांधली गेली आहे. त्याच्या कमानीची २६ मीटर उंची आहे, जी चार बुरुजांसह आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' हे देशाच्या राजकीय इतिहासाबद्दल परिमाण सांगणारे स्मारक असून मुंबईच्या उत्साही जीवनाशी परिचित होण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे आणि इतिहासप्रेमी, पर्यटक आणि फोटोग्राफर यांच्यामध्ये ते आवडते आहे. (क्रमश:)

 
@@AUTHORINFO_V1@@