मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |




मुर्शिदाबाद
: रा. स्व. संघातील कार्यकर्त्याच्या कुटुंबियांसह झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मुर्शिदाबादचे पोलिस अधीक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले की
, आरोपीचे नाव उत्पल बेहेरा असे आहे. जो व्यवसायाने गवंडी आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचा दावाही पोलिसांनी यावेळी केला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी सागरडीघीच्या साहपूर भागातून आरोपीला अटक केली आहे.


मुर्शिदाबाद येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय शिक्षक बंधू प्रकाश पाल
, त्याची गर्भवती पत्नी ब्यूटी आणि आठ वर्षांचा मुलगा हे ८ ऑक्टोबर रोजी जियागंज येथील त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले होते. दुर्गा पूजा उत्सव चालू असताना ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहेराने पाल यांना दोन विमा पॉलिसीसाठी पैसे दिले होते. पाल यांनी पहिल्या पॉलिसीची पावती दिली होती पण दुसर्‍या पॉलिसीची पावती दिली नाही. गेल्या काही आठवड्यांपासून त्यावर पाल आणि बेहेरा यांच्यात वाद सुरु होते. पाल यांनी त्याचा अपमान ही केला होता. याच वादातून बेहेरा याने पालयांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली. बेहेराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

 

राज्यपालांनी यासंदर्भात अहवाल मागवला असून  राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने आणि निःपक्षपाती चौकशीची खात्री करुन घ्यावी आणि आरोपींना लवकरच अटक करावी यासाठी पोलिसांना पत्र लिहिले आहे. यापूर्वी शनिवारी पोलिसांनी आणखी दोन लोकांना अटक केली. मुख्य आरोपी व्यतिरिक्त पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यामागे धार्मिक कारणांची शक्यता आहे. मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांड प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी याकरिता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, पक्षाचे नेते एस.एस. अहलुवालिया आणि मुकुल रॉय यांचा समावेश असणारे भाजपाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@