खासगी सुरक्षा कंपनी मालक सलीम खानची कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |




बंगळुरू : खासगी सुरक्षा कंपनीत आपल्याच कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सलीम खान या कंपनी मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

'न्यूज 9' या चॅनलने हा व्हीडिओ प्रसारित केला आहे. या चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, हा या खासगी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. या व्हिडिओत सलीम हा दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहे. नेटीझन्सनी हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे नेण्याची मागणी केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@