'मिसाईल मॅन' कलाम यांचे देशभरातून स्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिवंगत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि देशासाठीच्या त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी २१ व्या शतकातील उज्वल भारताचे स्वप्न पाहिले, जे सक्षम होते आणि नंतर त्यांनी आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अपूर्व योगदान दिले. त्यांचे आदर्श जीवन देशातील लोकांना प्रेरणा देत राहील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामजी यांना त्यांच्या जयंतीबद्दल अभिवादन” असे ट्विट केले. यात माजी राष्ट्रपतींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकणारा एक छोटासा व्हिडिओ आहे.


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी राष्ट्रपतींचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली ते देशातील लोकांच्या मनात कायम राहतील असे म्हणाले. "भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक अभूतपूर्व वैज्ञानिक डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. ते सामान्य लोकांचे राष्ट्रपती होते
,, त्यांच्या कार्यामुळे ते कायम भारतीयांच्या मनात राहतील. मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो." असे ट्विट राजनाथ सिंग यांनी केले.

 




देशाच्या क्षेपणास्त्र प्रकल्पांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणार्‍या अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला. २००२ मध्ये डॉ. कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती बनले आणि सर्वांसाठी त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे ते 'पीपल्स प्रेसिडेंट' म्हणून प्रसिद्ध झाले. २०१० मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने १५ ऑक्टोबरला 'जागतिक विद्यार्थी दिन' म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला. डॉ. कलाम अध्यापनासाठी खूप समर्पित होते आणि त्यांनी नेहमीच स्वतःला शिक्षक म्हणून संबोधले. माजी राष्ट्रपती कलाम यांना २७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलॉंग' येथे व्याख्यान देत असतानाच त्यांचे निधन झाले.

 




केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहताना नागरिकांना आठवण करून दिली की', "विद्यार्थ्यांप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि समर्पण यामुळे माजी राष्ट्रपतींचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ते खरे शिक्षक होते आणि विद्यार्थ्यांना ते आवडत असत. आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे विद्यार्थ्यांना व्याख्यान देतानाच त्यांचा मृत्यू भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असे ट्विट करत जावडेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

@@AUTHORINFO_V1@@