वरुण धवन साकारणार शहीद जवान अरुण खेतरपाल यांची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



१९७१ मधील भारत पाकिस्तान युद्धात आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद जवान अरुण खेतरपाल यांच्यावरील जीवनपटात नायकाच्या भूमिकेत वरुण धवन झळकणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. अंधाधूंन चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर श्रीराम राघवन पुन्हा एका आपले दिग्दर्शकीय कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत. यापूर्वी श्रीराम आणि वरुण धवन यांनी बदलापूर चित्रपटासाठी एकत्र काम केले होते आता पुन्हा एकदा त्यांच्यामधील ट्युनिंग चाहत्यांना पाहायला मिळेल.

वरुण धवनने सोशल मीडियावर शहीद जवान अरुण खेतरपाल यांचे व्यक्तिचित्र पोस्ट करून या चित्रपटासाठी काम करत असल्याची अधिकृत घोषणा केली. अरुण खेतरपाल यांना त्यांच्या साहस आणि शौर्यासाठी भारतीय सैन्यामध्ये दिल्या जाणाऱ्या मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. अवघ्या २१ वर्षाचे असताना पाकिस्तानी सैन्याशी त्यांनी झुंज दिली होती. या चित्रपटामधून त्यांची निडरता आणि सामर्थ्य याची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे.

दरम्यान वरुण धवन सध्या कुली नं. च्या सिक्वलसाठी काम करत आहे तर आगामी काळात रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर थ्री डी या चित्रपटात देखील तो झळकणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@