'दादा' बनला 'बीसीसीआय'चा बॉस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणजेच 'दादा' या भारताच्या एका नावाजलेल्या खेळाडूची निवड करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने त्याचे निकटचे प्रतिस्पर्धी ब्रिजेश पटेल यांना निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मागे टाकले.

 

दरम्यान गांगुली आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतील एकमेव उमेदवार राहिला आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजातच्या सुमारास त्याच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नियामक मंडळाच्या सदस्यांकडून वर्तवली जात होती. त्यानुसार त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नियामक मंडळ अडचणीच्या फेऱ्यात सापडले असताना, आपली अध्यक्षपदी निवड होणे, ही मंडळासाठी भरीव काम करण्याची संधी असल्याचे गांगुली याने सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

सौरव गांगुली भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू असून ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. भारतीय खेळाडूंपैकी सर्वाधिक धावा काढणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतील शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत भारतीय क्रिकेट संघाला विजयी करण्यात महत्वाचे योगदान दिले. याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय संघनायक होता.

@@AUTHORINFO_V1@@