बीसीसीआयमध्ये आणीबाणीची स्थिती असताना अध्यक्षपद : सौरव गांगुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याची निश्चित झाले आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि गरीबश्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या खुर्चीवर आता सौरव गांगुली बसणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावर सौरवने सांगितले की, " सध्या बीसीसीआयमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. मी अशावेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर बसत आहे, ज्यावेळी बोर्डाची प्रतिमा सतत ढासळत आहे. अशावेळी मला काहीतरी करून दाखवायची चांगली संधी मिळाली आहे." लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

 

फक्त १० महिन्यांचाच असेल कार्यकाळ

 

सौरव गांगुली जर अध्यक्ष झाला, तरी त्याचा कार्यकाळ हा फक्त १० महिन्यांचाच असेल. . बीसीसीआयच्या नियमांनुसार, एखादा व्यक्ती सलग ६ वर्ष बोर्डच्या कुठल्याही पदाचा कार्यकाळ सांभाळला असेल तर त्यानंतर त्याला 'कुलिंग ऑफ' (विश्राम) दिला जातो. सध्या गेली ५ वर्ष गांगुली हा बंगाल क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२०पर्यंत त्याचा हा कार्यकाळ असण्याची शक्यता आहे.

 

प्रथम श्रेणी क्रिकेट हे प्राधान्य असेल : गांगुली

"कार्यकाळ छोटा असला तरी पहिले प्राधान्य हे प्रथम श्रेणी क्रिकेटला असेल. प्रथम श्रेणी क्रिकेटपटुंकडे अधिक लक्ष्य दिले जाईल. तसेच भारतीय क्रिकेटमधील सर्व भागधारकांना भेटण्याची योजना आहे. मला काहीतरी असे करायचे आहे जे सीओएने गेले ३३ महिन्यांमध्ये नाही केले." असा विश्वास गांगुलीने यावेळी व्यक्त केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@