राम मंदिर सुनावणीवर संत-महंत म्हणतात, "शुभ घडी आ गई है"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 


अयोद्ध्या : अयोद्ध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान अयोद्ध्येत जनजीवन सुरळीत सुरू आहे. अयोद्ध्येत सर्वसामान्यांच्या चर्चेचा मुद्दाही हाच बनला आहे. अयोद्ध्या आणि फैजाबादमध्ये सुरक्षा रक्षा वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने १० डिसेंबरपर्यंत या भागाची सुरक्षा वाढवली आहे. इथल्या संत-महंतांचे म्हणणे आहे कि, "आता प्रतीक्षा संपणार आहे."

 

अयोद्धेत होणाऱ्या दीपोत्सवावरही साऱ्यांचे लक्ष आहे. उत्तर प्रदेश सरकारतर्फे दर दिवाळीला अयोद्धेत दीपोत्सव साजरा केला जातो यंदाचाही दीपोत्सव आकर्षण ठरणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी विजयपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शाळा महाविद्यालयांसह अन्य धर्मशाळांची यादी तयार करून त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक बसवण्यात येत आहे. केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे."

 

अयोद्ध्येत राम मंदिराचा निकाल येणार हे समजल्यावर अनेक श्रद्धाळू हे रामघाट मंदिर येथील कार्यशाळेत पोहोचत आहेत. रामजन्म भूमी, हनुमान गुढी, कनक भवन, सीता रसोई आणि कार्यशाळेच्या ठिकाणी अनेक श्रद्धाळूंची गर्दी झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@