देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएसने स्वीकारला पदभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 


तिरुअनंतपुरम : देशातील पहिली दृष्टिहीन आयएएस प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुअनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या प्रांजल पाटील यांनी २०१६ मध्ये यूपीएससीसाठी पात्र ठरल्या होत्या. तेव्हा त्यांचा देशभरामधून ७७३वा क्रमांक आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी रँकिंगमध्ये सुधारणा करत १२४ वा क्रमांक पटकावला होता.

 

प्रांजल पाटील या पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणाऱ्या त्या केरळ केडरमधील पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत. प्रशिक्षण चालू असताना काही काळ त्या एर्नाकुलमचे सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या. "आपण कधीही हार मानू नये. कारण केवळ आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात." अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@