"IRCTC"मध्ये गुंतवलेले पैसे झाले दुप्पट : गुंतवणूकदार मालामाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले होते. त्यानुसार, मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर १०१ पटीने नोंदणी करत समभाग ६४४ रुपयांवर खुला झाला. दिवसभराच्या सत्रात तो ७३४ रुपयांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टीवर ९५.६ टक्क्यांच्या वाढीसह तो ७४३.८० रुपयांवर पोहोचला.

 

आयआरसीटीसीच्या आयपीओला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ६४५ कोटींच्या प्रार्थमिक समभाग विक्रीला १२२ पटींची नोंदणी झाली. ३० सप्टेंबर रोजी खुला झालेल्या ही खुली विक्री ३ ऑक्टोबर रोजी बंद झाली होती. यावेळी प्रतिसमभाग किंमत ही ३१५ ते ३२० रुपये इतकी होती.

 

आयपीओअंतर्गत कंपनीचा १२.५ टक्के हिस्सा विकण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. याद्वारे एकूण सहाशे कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले. याबाबत अंतिम निर्णय गुंतवणूक आणि जन परिसंपत्ती प्रबंधन विभाग (दीपम) या विभागातर्फे करण्यात आली. आयआरसीटीसी अंतर्गत ९९.९९ टक्के हिस्सा हा सरकारकडे आहे. यातील एकूण समभागांची संख्या १५ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९४ इतकी आहे. तर सात गुंतवणूकदारांकडे प्रत्येकी आठ समभाग आहेत.

 

दोन कोटी समभागांची विक्री केली गेली. समभागांचे दर्शनी मुल्य दहा रुपये इतके होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण २७२.६० कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. याच वर्षात कंपनीला एकूण १ हजार ९५६. ६६ कोटी इतका महसुल मिळाला होता. विशेष म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.

@@AUTHORINFO_V1@@