अयोध्या सुनावणी : सुब्रमण्यम स्वामींना न्यायालयात पाहून मुस्लीम पक्षाचे वकील अस्वस्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |
 

 
राजीव धवन यांनी नोंदवला आक्षेप  
 
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): अयोध्या सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सुनावणीचा हा शेवटचा आठवडा आहे. मुस्लीम पक्षाच्या वतीने राजीव धवन बाजू मांडत आहेत. सोमवारी अयोध्या प्रकरणी ३८ वी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुप्रसिध्द विधिज्ञ सुब्रमण्यम स्वामी उपस्थित होते. स्वामींच्या पुढल्या खुर्चीत बसण्यावर वकील राजीव धवन यांनी हरकत नोंदवली आहे. 


सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या १८ ऑक्टोबरला सर्व बाजूंनी स्वतःचे युक्तिवाद संपवायचे आहेत. त्यानंतर निकालपत्र लिहिण्याचे काम सुरु होईल. सोमवारी सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने युक्तिवाद मांडणे सुरु होते. 'बाबराच्या कृत्याची समीक्षा  न्यायालय करू शकत नाही' , असे धवन म्हणाले. 'जर बाबराच्या कामची समीक्षा होणार असेल; तर सम्राट अशोकाच्या कामाचीही समीक्षा झाली पाहिजे', असही ते म्हणले. 


न्यायालयाने हिंदू पक्षापेक्षा आम्हाला जास्त प्रश्न विचारलेत , मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांचा दावा


सुनावणी पूर्ण करण्यासाठी समयसीमा चुकीची निर्धारित करण्यात आली आहे तसेच पुरेसा वेळ युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी मिळत नाहीये, अशीही तक्रार राजीव धवन यांनी केली. सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या वतीने प्रश्न विचारण्याचा अधिकार न्यायाधीशांना असतो. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने हिंदू-मुस्लीम दोन्ही पक्षांना प्रश्न विचारले होते. राजीव धवन यांनी मात्र न्यायाधीशांनी आम्हालाच जास्त प्रश्न विचारले आहेत, असा आरोप न्यायालयावर केला. 'हिंदूपक्षाला कमी प्रश्न विचारले गेले', असा वकील राजीव धवन यांचा दावा आहे. 

१९९२ पूर्वी जसा ढांचा होता, त्याच स्थितीत आम्हाला परत देण्यात यावा, अशी मागणी मुस्लीम पक्षाने सोमवारी केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@