आजाराचे विश्लेषण भाग-६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



डॉ. जे. टी. केंट यांनी लक्षणांचे वर्गीकरण लक्षणांच्या महत्त्वानुसार व त्यांच्या तीव्रतेनुसार केले. हे वर्गीकरण करत असताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेसुद्धा नोंदवून ठेवली. ही निरीक्षणेसुद्धा त्यांनी अनेक रुग्णांच्या लक्षणांच्या अभ्यासातून आलेल्या अनुमानावरून काढली जातात. त्यातील काही महत्त्वाची निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत-


) 'विशेष लक्षणे' ही नेहमी सामान्य लक्षणांच्या वरचढ असतात. 'सामान्य लक्षणे' ही जरी खूप असली तरी ती विशेष, महत्त्वपूर्ण लक्षणांच्या तुलनेत कमजोर असतात.

 

) काही केसेसमध्ये अवयवांची लक्षणे (Particular symptom) ही फार महत्त्वपूर्ण, दुर्मीळ व आजारवर्धक व शामक लक्षणांनी परिपूर्ण असतात. अशावेळी एखाद्या कमकुवत विशेष लक्षणांच्या ती वरचढ ठरतात.

 

) विशेष लक्षणे ही जर तीव्रतेने दिसत असतील तरच त्याचे महत्त्व असते.

 

) शरीरातील जे अत्यंत महत्त्वाचे अवयव व शरीर संस्था आहेत, त्यांच्या बाबतची लक्षणे ही इतर त्यामानाने कमी महत्त्वाच्या अवयवांच्या लक्षणांपेक्षा नेहमी महत्त्वाची गणली जातात. 

उदा. चेतासंस्था, मेंदू, चेतारज्जू यांची लक्षणे, तसेच हृदय व रक्ताभिसरण संस्था, फुप्फुसे व श्वसन संस्था व उत्सर्जन संस्था यांच्या बाबतीतील लक्षणे ही सर्वात महत्त्वाची असतात. त्यामानाने स्नायू, सांधे तसेच त्वचा इत्यादी लक्षणे कमी महत्त्वाची गणली जातात. कमी महत्त्वाची म्हणजे ती सोडून दिली जातात, असे मात्र अजिबात नाही.

 

) शरीरामध्ये पेशीबदल किंवा काही असामान्य बदल होण्याआधी रुग्णांना जाणवणारी लक्षणे फार उपयुक्त ठरतात.

उदा. आकडी किंवा फीट्स येण्याआधी रुग्णाला जाणवणारी लक्षणे ही त्या आजाराची वा रुग्णांची विशेष लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्यांना महत्त्व आहे.

 

. मानसिक आजारावर उपचार करत असताना, शरीरावर येणारी विशेष लक्षणे ही महत्त्वाची ठरतात, तसेच शारीरिक पेशींच्या आजारात मानसिक लक्षणेही महत्त्वाची असतात.

 

औषधसिद्धतेच्या वेळी (Homeopathic drug proving) आलेल्या लक्षणांचे वर्गीकरण ही खालीलप्रमाणे होते. हे वर्गीकरण झाल्यामुळे औषधामध्ये सापडलेली कुठली लक्षणे महत्त्वाची व कमी महत्त्वाची हे समजून येते. रुग्णाच्या लक्षणांशी पडताळून पाहताना त्याचा उपयोग होतो. त्याचे वर्गीकरण-

 

)प्रथम श्रेणी लक्षणे :

 

) प्रथम दर्जाची लक्षणे ही अशी असतात की, जी बहुतांश सर्व सिद्धकांमध्ये दिसून येतात.

) ही लक्षणे पुन्हा पुन्हा केलेल्या औषधसिद्धतेमध्येही दिसून येतात.

) ही लक्षणे आजारी माणसामध्येही पडताळून पाहिलेली असतात.

 

) द्वितीय श्रेणी लक्षणे :

 

) ही लक्षणे सर्व सिद्धकर्त्यामध्ये दिसत नाहीत, काही ठराविक लोकांमध्येच दिसतात.

) ही लक्षणे परत केलेल्या औषध सिद्धतेतही दिसून येतात.

) मात्र, रुग्णांमध्ये क्वचितच पडताळून पाहिली जातात.

 

) तृतीय श्रेणी लक्षणे :

 

) काही लक्षणे ही औषध सिद्धतेच्या वेळी फार कमी सिद्धकर्त्यामध्ये दिसून येतात.

) परत करून पाहिलेल्या औषध सिद्धतेतही तीव्रतेने दिसत नाहीत.

) परंतु, रुग्णांमध्ये आजार बरा करण्यात ही वापरून पाहिली असता त्यांचा चांगला उपयोग होतो. परंतु, पडताळणी झालेली नसते याला 'क्लिनिकल लक्षणे म्हणतात.

 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@