मोदींच्या हातात 'प्लॉगिंग' करताना काय होते ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या स्वागतानंतर शनिवारी पहाटे मामल्लापुराम येथील किनारपट्टीला भेट दिली. यावेळी समुद्र किनारी पडलेला प्लास्टीक कचरा पंतप्रधानांनी गोळा केला. मात्र, त्यांच्या हातात एक रुळासारखी गोष्ट कोणती होती, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. नेटीझन्सकडून यासंदर्भात वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, खुद्द पंतप्रधानांनीच या चर्चेवर पडदा टाकला आहे.

 

रविवारी मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. प्लोगिंगवेळी हातात एक्युप्रेशर रोल होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. मोदींनाही बऱ्याचजणांनी या रोलबद्दल विचारले होते. एक्युप्रेशर रोल मी बऱ्याचदा वापरत असतो, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.



अॅक्युप्रेशर रोलर हा रेफ्लेक्सोलॉजी तंत्र वापरतो. हा वापरल्याने तणाव दूर होण्यास व इतर आजार बरे होण्यास मदत होते. अॅक्युप्रेशर रोलरच्या वापराने शरीरातील हात, पाय आणि डोक्यावरील रिफ्लेक्स पॉइंट्सवर दबाव निर्माण होतो. त्याने तणाव आणि इतर आजार बरे होण्यास मदत होते. अॅक्युप्रेशर रोलरच्या वापराने ताण-तणाव दूर होऊन मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते, असे याचे अभ्यासक सांगतात.

 

@@AUTHORINFO_V1@@