खासदार पूनम महाजन यांना 'युवा नेतृत्व सन्मान' पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |
 


मुंबई : खासदार पूनम महाजन व 'भाजयुमो'च्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांचा 'युवा नेतृत्व' सन्मानाने गौरव करण्यात आला. 'झी युवा' या आघाडीच्या टीव्ही वाहिनीतर्फे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा नेतृत्वाचा सन्मान करण्यात येतो. यंदाजा 'युवा नेतृत्व' सन्मान पूनम महाजन यांना मिळाला. "अशा सन्मानामुळेच मला जनसेवाकार्य करण्यासाठी आणखी उर्जा मिळते," अशी प्रतिक्रीया खा. पूनम महाजन यांनी यावेळी दिली. दरम्यान, या पुरस्काराबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









 

@@AUTHORINFO_V1@@