युतीची सत्ता येणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास



औरंगाबाद : "आगामी निवडणुकांत युतीची सत्ता येणारच," असा विश्वास रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आौरंगाबादमधील सिल्लोड येथे शिवसेनचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "भाजप-शिवसेना सरकारने राज्यात आत्तापर्यंत चांगले काम केले असून आगामी काळात युतीची सत्ता येणारच. मात्र त्यासाठी संतांचे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. आपण एक परंपरा घेऊन पुढे चाललो आहोत. आज वाल्मिकी जयंती आहे. मी सर्वांतर्फे त्यांना वंदन करतोकारण जनता जनार्दन हा खरा देव असतो आणि त्यांचा आशीर्वाद सहजासहजी मिळत नाही. थापाड्या लोकांना तर हा आशीर्वाद अजिबातच मिळत नाही. काही माणसांना सभेला गर्दी जमत नाही म्हणून माणसे भाड्याने आणावे लागतात. आपल्याकडे असे नाही. आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत म्हणजे आपल्याकडे सत्ता येणार आहे. ही विचाराने सोबत आलेली माणसे आहेत. आजची ही सभा २४ तासांत ठरलेली आहे. अक्कलकुवा दुर्गम आणि दुर्लक्षित भाग असून देखील तिथे भरपूर गर्दी होती. जणू भगव वादळ उसळले होते.

 

मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, लढायचे आणि जिंकायचे. इथे विजय मिळणार हे मला समोर स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेला का जिंकून आणायचे? त्यासाठी एकदा तुम्ही वचननामा वाचा. निवडणुका येतात, निवडणुका जातात; परंतु कधीही खोटे बोलायचे नाही. ही आमची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुखांची तशी शिकवण आहे. जे मी बोलेन ते मी करेन हा शिवसेनेचा खाक्या आहे. मी जेव्हा तुमच्यासमोर येईन तेव्हा तुम्ही आनंदाने माझे स्वागत करायला पाहिजे. अब्दुल सत्तार यांना शिवसेनेचे विचार पटले आहेत. म्हणून ते एका विचाराने एकत्र आले आहेत, " असे ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@