सरकारकडून विरोधकांची गळचेपी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |




लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप रविवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी लातूर येथील औसामधील आपल्या पहिल्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “भाजप सरकारच्या काळात उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ झाले. मात्र, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शाह मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहेत. येथे कर्ज फेडले नाही तर शेतकर्‍याला तुरुंगात टाकले जाते मात्र, उद्योगपतींना अटक होत नाही. या सरकारने सर्वसामान्य शेतकर्‍यांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घातला. अदानी, अंबानींची कर्जे माफ केली पण, शेतकर्‍याचे कर्ज या सरकारला माफ करता आले नाही.”

 

बेरोजगारीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. “एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल तर दुसरीकडे नोकरी नाही म्हणून तरुण बेरोजगार. ४० वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी भारतात निर्माण झाली आहे. मोदींनी देशाचे वाटोळे केले. चंद्रावर रॉकेट पाठवून तरुणाचे पोट भरणार नाही. नोटाबंदीवरून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान आणि कलम ३७० चे मुद्दे रेटले जात आहेत. सरकार इस्त्रोच्या कामगिरीचे यश घेऊ पाहत आहे. इस्त्रोची स्थापना काँग्रेसने केली. पण आता त्याचे श्रेय मोदी घेत आहेत. ‘मेक इन इंडिया नव्हे; तर मेड इन चायना’ म्हणण्याची वेळ आली आहे. जीएसटीमुळे व्यापार्‍यांचे हाल होत आहेत. गुजरातमधील कापड उद्योग, हिरे व्यापारी मंदीच्या गर्तेत सापडले आहेत. पण त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये एक शब्दही लिहून येत नाही. इतकी या सरकारने गळचेपी केली आहे, ” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

@@AUTHORINFO_V1@@