विरोधकांना मोदींचे खुले आव्हान : हिंम्मत असेल तर ३७० पुन्हा लावून दाखवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |


 


जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पहिले रणशिंग जळगावच्या प्रचारसभेतून फुंकले. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. कलम ३७०चा मुद्दा भाजप निवडणूकीत करत असल्याचा आरोप विरोधकांनी गेल्या काही काळापासून लगावला होता. मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.




 
 

नरेंद्र मोदी म्हणाले, "तुमच्यात हिम्मत असेल तर ५ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला तो निर्णय तुम्ही पुन्हा बदलून दाखवावा. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० व कलम ३५ ए लावून दाखवावे." या सोबतच तिहेरी तलाक विधेयकही रद्द करून दाखवावे, असे मोदी म्हणाले. "तुम्ही मगरीचे अश्रू रडणे बंद करा, तुमचे आणि शेजारील राष्ट्रांचे बोलणे हे एकच दिसते. असे लोक महाराष्ट्र निवडणूकांमध्ये मत मांगण्यासाठी येत असतात. देशभावनेशी एकनिष्ठ राहण्यात त्यांना संकोच वाटतो आहे.", असा टोलाही त्यांनी लगावला.

 

"तिहेरी तलाक विधेयकावरून त्यांनी कॉंग्रेसला पुन्हा घेरले. मुस्लीम महिलांना आम्ही ज्यावेळी अधिकार देण्याचा मुद्दा संसदेत मांडला त्यावेळी मुस्लीम मतांचे राजकारण करणाऱ्या याच पक्षांनी त्यात आडकाठी घातली. मात्र, आम्ही आमच्या भगिंनींना दिलेले वचन निभावले होते. विरोधकांना मी पुन्हा आव्हान देतो. कि, त्यांनी तिहेरी तलाक विधेयक रद्द करून दाखवावे."

@@AUTHORINFO_V1@@