'इन्स्टाग्रामवर'ही मोदींचा दबदबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



तीन कोटी फॉलोअर्ससह बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते


नवी दिल्ली : फेसबूक आणि ट्विटरवर सर्वात जास्त लोकप्रिय नेता अशी ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता इन्स्टाग्रामवरही नवा विक्रम केला आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या एकूण तीन कोटी इतकी झाली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही ४८ लाख आहे. तर बराक ओबामा यांना एकूण ४८ लाख जण फॉलो करतात. यांच्या तुलनेत मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या ही सहापट अधिक आहे. युवा वर्गामध्ये लोकप्रिय असणाऱ्या इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दबदबा कायम आहे.

@@AUTHORINFO_V1@@