टीम इंडियाकडून द.आफ्रीकेचा सलग दुसऱ्यांदा धुव्वा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |
 


ऑस्ट्रेलियाचा 'हा' विक्रमही मोडीत...वाचा सविस्तर



पुणे : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या मैदानावर भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या दुसऱ्या सामन्यावर टीम इंडियाने १३७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह या मालिकेतील आपला विजयही निश्चित केला आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारताने द.आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय मिळवला होता. २०१२-१३ पासून मायदेशात एकही सामना गमावला नाही. ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम भारताने मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने १९९५ ते २००१ दरम्यान मायदेशात सलग १० कसोटी सामन्यांवर विजय मिळवला आहे. या विक्रमात वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

 

दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाने ५ बाद ६०१, अशी धावसंख्या उभारली. मात्र, द.आफ्रीकेचा डाव अवघ्या २७५ धावांत आटोपला. दुसऱ्या डावातही त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. ६७.२ षटकांत १८९ धावा करत संपूर्ण संघ तंबूत परतला. भारतातर्फे आर.अश्विनने (४-२), उमेश यादवने (३-३) गडी बाद करत द.आफ्रीका संघाला रोखले.

 

रविंद्र जडेजा (१-३) मोहम्मद शमी (१-२) बळी घेण्यात सफल झाले. इशांत शर्माला मात्र, एकच गडी टीपता आला. दक्षिण आफ्रीकेन संघाच्या फलंदाजीत डीन एलगरने सर्वाधिक ४८ धावा ठोकल्या. त्याशिवाय टेम्बा बावुमा (३८), वर्नोन फिलॅंडर (३७), केशव महाराज (२२) इतकेच फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकले. एडेन मार्कराम आणि एनरिक नोर्टेजे यांना खातेही उघडता आले नाही.

@@AUTHORINFO_V1@@