एफटीएफ बैठक : पाकिस्तानवर फैसला होणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : एफएटीएफच्या युनिट एशिया पॅसिफिक ग्रुपने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी निधी रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. या बैठकीत पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते,  असे सांगण्यात येत आहे. पॅरिसमध्ये उद्या यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट कायचे कि नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. इराण आणि उत्तर कोरियासह पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. दहशतवाद संदर्भात अर्थसंकल्पात लगाम घालण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याबद्दल एफएटीएफने जून महिन्यात पाकिस्तानला फटकारले. एफटीएफने काळ्या यादीत कायम ठेवल्यास पाकिस्तानला जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून होणारी मदत आणि कर्ज नाकारले जाईल.


गेल्या वर्षीही पाकिस्तानला एफएटीने 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकले होते. २०१९ मध्ये पाकिस्तानने दहशतवादाला मिळणारी आर्थिक रसदेवर लगाम घालावा याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही पाकिस्तान यावर निर्बंध आणण्यात निष्क्रिय ठरल्याने आता पाकिस्ताला एफएटीएफच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले. १४ आणि १५ ऑक्टोबरला होणाऱ्या एफएटीएफच्या बैठकीत आता याबाबत निर्णय घेण्यात येईल. याच वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात एशिया पॅसीफीक ग्रुपने देखील पाकिस्तानला दहशतवादाला आर्थिक रसद पुरविणे व मनी लॉंडरिंगच्या ४० मानकांपैकी ३५ मानकांमध्ये फेल झाला
,याच कारणावरून या ग्रुपमध्ये पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले होते. या बैठकीत पाकिस्तान ग्रे यादीमध्ये कायम राहील की काळ्यासूचीत असेल का याचा निर्णय घेतला जाईल. तथापि, चीन मित्राला काळ्या यादीत टाकण्यापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.



आर्थिक व्यवहार विभागाचे प्रमुख हम्मद अझर यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानी शिष्टमंडळ आज फ्रान्सला रवाना होणार आहे
, कारण एफएटीएफ १४ आणि १५ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या मुद्दय़ावर विचार करेल, अशी माहिती मिळते. पाकिस्तानी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसीपी) अंतिम निर्णय दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे वित्तीय संस्थांना एका वर्षात २१६ संशयास्पद व्यवहारांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर गेल्या आठ वर्षांत पाकिस्तानमध्ये अशी एकूण १३ प्रकरणे नोंदली गेली.

@@AUTHORINFO_V1@@