नंदनवनाचा फुलमाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



‘गोकुळ : द व्हॅली ऑफ फ्लॉवर’ या घरासमोरील बागेत हॉलंडमधील ट्युलिप्स ते महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीअशी असंख्य रोपे लावून नंदनवन फुलविणाऱ्या जोधपूरमधील ६५ वर्षीय रवींद्र काबरांविषयी...


जोधपूरमधील रवींद्र काबरा हे लोकप्रिय आहेत
, ते त्यांच्या विशिष्ट छंदामुळे. व्यवसाय आणि छंद या दोन्हीचा समन्वय साधत त्यांनी आपल्या घरात नंदनवन उभारले आहे. लहानपणी जेव्हा ते आपल्या आजोबांसोबत बागेत जात तेव्हापासूनच त्यांनी बागकामाचे धडे घेतले. आज मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या घराच्या परिसरात आपल्या आजोबांच्या नावाने ‘गोकुळ : द व्हॅली ऑफ फ्लॉवर’ उभारले आहे.


शालेय शिक्षण घेत असतानाच रवींद्र काबरा आपल्या आजोबांसोबत बागकाम करत असत
. पुढे उच्च शिक्षणासाठी ते अहमदाबादला रवाना झाले. १९७० ते १९७८ दरम्यान ते अहमदाबादला होते, तेथेही त्यांनी आपली आवड जोपासत ‘टेरेस गार्डनिंग’ केले. १९८० मध्ये ते पुन्हा मूळगावी आले व स्वतःचा व्यवसाय सुरू केला. १९८० मध्ये त्यांनी स्वतःचास्टील प्लांट सुरू केला, ज्यामध्ये स्टेनलेस स्टीलला पत्रकात वितळवण्यासाठी कच्चा माल बनविला गेला. १९८४मध्ये जोधपूरमधील प्रथम स्वयंचलित ‘ब्रेड प्लांट’ची स्थापना केली. १९९२ मध्ये त्यांचे दोन्ही कारखाने बंद झाले आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक शोरूम सुरू केली. हे यशस्वीरित्या ११ वर्षे चालले. या सर्व व्यावसायिक कामात गुंतल्यानंतरही त्यांची बागकाम करण्याची आवड कमी होण्याऐवजी वाढत होती. त्यांनी कारखान्यांच्या परिसरात मोठी उद्यानेदेखील विकसित केली. परंतु, या ठिकाणी ते अधिक काळ रमले नाही. अखेरीस २००२ मध्ये त्यांनी अर्धवेळ करत असलेल्या बागकामाचे रूपांतर पूर्णवेळ कामात केले. बघता बघता एक छंद म्हणून जोपासत असलेल्या आवडीचे रूपांतर एका व्यवसायात झाले. सध्या रवींद्र यांच्या उद्यानात हॉलंडच्या ट्युलिप्सपासून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपर्यंत सर्व काही आहे! ‘गोकुळ’ या बागेत देश-विदेशातील जवळपास सर्व प्रजातींची रोपे वाढविण्यात काबरा यांना यश आले आहे. काही प्रजाती अशा आहेत की,ज्या फक्त त्या प्रदेशातील तापमानातच जगू शकतात, अशी फुले जोधपूरच्या उच्च तापमानातदेखील उत्तमरीत्या फुलली आहेत. याव्यतिरिक्त तब्बल सहा हजार कुंड्यांमध्ये १५० प्रकारची वेगवेगळी रोपे आहेत, ज्यात २५ प्रकारची कमळे, २५० प्रजातीची अडेनियम, २५० प्रकारची गुलाबाची रोपे २५ प्रजातींच्या बोगनवेली आहेत.


रवींद्र काबरा सांगतात की
, “ट्युलिप्स फक्त हॉलंडमध्ये फुलणारी प्रजाती आहे. लोक हे फूल पाहण्यासाठी हॉलंडला जातात. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु, माझ्या बागेत ट्युलिप्सची फुलेही फुलली आहेत. हायड्रेंजियादेखील एक वेगळ्या प्रकारचे फूल आहे, जे फक्त हिल स्टेशनवर वाढते. अझिलिया हीही एक प्रजाती इथे आहे, जी केवळ हिल स्टेशन किंवा थंड ठिकाणी आढळू शकते. हेलिकोनिआस किनारपट्टीच्या क्षेत्रात वाढणारी एक वनस्पती आहे. ऑर्किड ही वाळवंटात वाढणारी वनस्पती आहे. जर तुम्ही कोणाला सांगितले, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही पण या धगधगत्या शहरात स्ट्रॉबेरी वाढविण्यातदेखील मला यश आले.” रवींद्र पहाटे ५ वाजता त्याच्या बागेत येतात, ते रात्री ११ वाजेपर्यंत बागेत असतात. या दरम्यान ते आपल्या या रोपट्यांना भजने ऐकवितात. संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत ही झाडे भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतात. कधीकधी त्यांना जुन्या चित्रपटातील गाणीदेखील ऐकवली जातात. याबाबत त्यांचे निरीक्षण असे आहे की, सुरुवातीला या वनस्पतींचा वाढण्याचा वेग हा ९० टक्क्यांपर्यंत होता जो आता ११० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. प्रत्येकजण जो त्यांना भेट देण्यासाठी किंवा बाग पाहण्यासाठी दररोज येतो तो याबाबत आश्चर्य व्यक्त करतो.


अत्यंत नम्र स्वभाव असणारे रवींद्र काबरा आपल्या मित्रांना विनामूल्य रोपे देतात
. मोठ्या कॉर्पोरेट घरांसाठी लॅण्डस्केपिंग प्रकल्पही त्यांनी राबविले आहेत. त्यांनी विकसित केलेली अनेक उद्याने देशभरात आहेत. २००३ हे वर्ष त्यांच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्ष होते, जेव्हा त्यांनी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा प्रकल्प हाती घेतला. याशिवाय त्यांनी दिल्लीच्या ‘अंसल ग्रुप’साठी ४०० एकरचे चार प्रकल्प केले आहेत. त्यांनी जोधपूरमधील जगातील दुसर्‍या क्रमांकाचा खाजगी वाडा ‘उमेद भवन पॅलेस’, ‘पार्श्वनाथ ग्रुप’, ‘ताज ग्रुप’, ‘मिलिटरी’, ‘जोधपूर डेव्हलपमेंट अथॉरिटी’ यांसह अनेक शैक्षणिक संस्थांसाठी उद्याने विकसित केली. आपली बागकाम कला त्यांनी अजमेर, कोटा, दिल्ली, अमृतसर, मुंबईसह अनेक ठिकाणी पसरविली आहे.



आपल्या निरोगी आयुष्याचे सर्व श्रेय ते त्यांच्या बागेचे असल्याचे म्हणतात
. आलेल्या पाहुण्यांनाही ते रोजच्या दिनक्रमातील ठराविक वेळ बागेत फिरण्यासाठी द्यावा, अशी सूचना करतात. जर आपण आजारी असाल आणि बागेत अर्धा तास फुले व झाडांसोबत घालवत असाल तर निसर्गात बरा होत नाही असा आजार नाही. कदाचित म्हणूनच ६५ वर्षांचे असूनही ते कोणत्याही मदतनीसाशिवाय आपल्या बागेतील सर्व कामे व्यवस्थापित करतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कामात व्यस्त असणारे काबरा रविवारी पूर्ण दिवस ‘गोकुळ’मध्ये घालवतात. एक लाख रुपयांपासून ते दोन कोटीपर्यंत लॅण्डस्केपिंग प्रकल्प करणारे रवींद्र यांचे उद्दिष्ट व्यवसायापेक्षा कोणत्याही प्रकल्पातील झाडे ही आपल्याच बागेतील झाडे आहेत, असे समजून त्यांना जगवणे हे आहे. त्यांना असेही वाटते की, या वनस्पतीचा मृत्यू होऊ नये. ते अनेकदा स्वत: गार्डनर्सबरोबर काम करतात, जेणेकरून ते स्वतःच त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकतील, त्यांना त्यांच्या अनुभवांमधून नवीन शिकवतील. शेवटी ते इतकेच सांगतात, मी या कामामुळे अजूनही तरुण आहे. मी भाग्यवान आहे की, देवाने मला या कामासाठी निवडले.



-गायत्री श्रीगोंदेकर 
@@AUTHORINFO_V1@@