मनसे-काँग्रेसची एकजूट नाहीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019   
Total Views |



नाशिक मध्य मतदारसंघात रंगणार चौरंगी लढत


उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय मतदारांचा मतदारसंघ अशी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे
. या विधानसभा मतदारसंघावर आजवर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मनसेने माघार घेतल्यानंतर, त्या बदल्यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार तथा माजी आमदार नितीन भोसले यांच्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील यांनी माघार घ्यावी, असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र, त्यात अपयश आल्याने भाजप आमदार देवयानी फरांदे, यांचा नितीन भोसले, हेमलता पाटील व वंचित आघाडीचे उमेदवार संजय साबळे असा चौरंगी सामना यावेळी लरंगणार आहे.



राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांत मनसे व आणि काँग्रेस
-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची छुपी युती झाली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी मनसेने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्यासाठी माघार घेतली. त्याबदल्यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार भोसले यांच्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार पाटील यांची माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, यात यश न आल्याने हा तिढा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी जाऊन पोहोचला. त्यांनी नाशिक पूर्वला पाठिंबा द्यायचा असेल तर नाशिक मध्य मतदारसंघामध्ये दोन्ही काँग्रेसकडून मदत अपेक्षित असल्याचा युक्तिवाद केल्याची चर्चा आहे. त्यानुसार, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चादेखील केली होती. मात्र, काँग्रेसकडून त्यास दाद न मिळाल्यामुळे अखेरपर्यंत हा तिढा काही सुटला नाही.



मनसेच्या याच खेळीचा फायदा भाजपला या मतदारसंघात होण्याची जास्त शक्यता आहे
. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने खडे फोडत राज ठाकरे यांनी मतांचा जोगवा मागितला होता. त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक शहराच्या मध्यवस्तीत विस्तारलेला हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ. नाशिक शहराचा खरा चेहरा दाखविणारा, सर्वजाती धर्माचा प्रभाव दिसून येणारा गरीब-श्रीमंत अशी मिश्र लोकवस्ती असणारा, शहराची वाडा संकृती जपणारा, गावठाण भाग सामावून घेणारा आणि तेवढाच पुढारलेला हा मतदारसंघ. गंगापूर रोड, कॉलेज रोडसारखी ‘हाय प्रोफाईल’ लोकवस्ती सामावणारा शहराची मुख्य बाजारपेठ, महत्त्वाची शाळा, महाविद्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय असे सारेच या मतदारसंघात सामावलेले आहे.






यापूर्वी भाजपचे डॉ
. डी. एस. आहेर आणि या मतदारसंघाचे सुरुवातीपासूनच समीकरण राहिले आहे. आहेर यांच्या रूपाने आरोग्यमंत्रिपद या मतदारसंघाला लाभले आहे. शहराच्या माजी उपमहापौर आणि आताच्या उमेदवार आ. देवयानी फरांदे २०१४ मध्ये या मतदारसंघातून तब्बल ६१ हजार मतांनी निवडून आल्या. भाजपला असणारे अनुकूल वातावरण लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार हेमंत गोडसेंना मिळालेली ९४ हजार मतांच्या रूपाने या मतदारसंघात पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यातच फरांदे यांची असणारी लोकप्रियता त्यांनी अत्याधुनिक एसटी स्थानकाचे सुरू केलेले काम, विविध शासकीय योजनांची केलेली यशस्वी अंमलबजावणी यामुळे फरांदे यांच्याबाबत या मतदारसंघात कमालीची आपुलकी दिसून येते. याउलट २००९ मध्ये आमदारकी भूषविणार्‍या मनसेला यंदाच्या निवडणुकीत मात्र पुन्हा नितीन भोसले हेच उमेदवार मिळाल्याने आणि यापूर्वीची त्यांच्या कामगिरीवर मतदार नाखूष असल्याने आव्हान उभे राहिले आहे. डॉ. हेमलता पाटील यांची एक अभ्यासू आणि उत्तम वक्ता अशी ओळख असली तरी, काँग्रेसला न मानणारा वर्ग येथे असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे पाटील यांच्या समोर एक मोठे आव्हान असणार आहे. मतदारसंघात गोदा पार्कसह काही प्रश्न प्रलंबित असले तरी, फरांदे यांचा अभ्यास करण्याची वृत्ती आणि प्रभावीपणे विधिमंडळात मुद्दे मांडण्याची पद्धती यामुळे मतदार त्यांना यंदा पुन्हा संधी देण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@