कॉंग्रेस आता वैचारिक दिवाळखोर बनली आहे : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |




कोल्हापूर / सातारा : कॉंग्रेस आता वैचारिक दिवाळखोर बनली आहे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला. कराड येथे महाजनादेश संकल्प सभेदरम्यान त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कॉंग्रेसने काहीही केलेले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अक्ष्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सरकारने जेव्हा कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली त्यावर कॉंग्रेसला विरोध करावासा वाटत आहे. ही वैचारिक दिवाळखोरी नाहीतर आणखी काय आहे, असा सवाल अमित शाह यांनी कॉंग्रेसला लगावला. कराड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त ते बोलत होते. यावेळी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तलवार देत अमित शाह यांचे स्वागत केले.


महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मतदारांना महायुतीच्या विजयाचे संकल्प करण्याचे आवाहन केले. रविवारी सकाळी येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “कृषी, दूध, उद्योग, परकीय गुंतवणूक, शिक्षण या क्षेत्रांमध्ये एक क्रमांकावर असलेला महाराष्ट्र १५ वर्षांत आघाडी सरकारच्या कालावधीत १५ क्रमांकाच्याही खाली गेला. पण, पाच वर्षांतच फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आला. यासोबतच शिक्षणात तिसर्‍या क्रमांकावर तर कृषी व उद्योगक्षेत्रात त्यांनी राज्याला पाचव्या क्रमांकावर आणून ठेवले आहे. आणखी पाच वर्षे द्या, महाराष्ट्र या सर्वच क्षेत्रामध्ये एक नंबरचे राज्य बनवू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 
 

आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “राज्यातील काँग्रेस आघाडीच्या काळात भ्रष्टाचार होता. ७० हजार कोटी सिंचन प्रकल्पावर खर्च करूनही पाणी आले नव्हते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने नऊ हजार कोटी खर्च केले व जलयुक्त शिवारातून १८ हजार गावांत पाणी दिले. कोल्हापुरात रस्तेबांधणी करण्यात आली, पण त्यासाठी टोल आकारला जात होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ४५० कोटी देऊन जनतेच्या मानगुटीवर बसणारा टोल रद्द केला. केंद्र व राज्यात एकच सरकार असल्यानेच महाराष्ट्राचा विकास झाला,” असे शाह यांनी नमूद केले.

 

३७० कलमाबाबत बोलताना शाह म्हणाले की, “काँग्रेसने ३७० कलम देऊन काश्मीर भारतात आणण्यापासून रोखले होते. त्यामुळे तेथील युवकांच्या हातात पाकिस्तानने हत्यारे सोपवली आणि ४० हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले. अनेक सरकार, पंतप्रधान आले व गेले पण, त्यांची हिंमत झाली नव्हती. देशातील जनतेने लोकसभेच्या ३०० हून अधिक जागा भाजपला दिल्यानंतर मोदी यांनी पहिल्याच अधिवेशनात ३७० व ३५ ए काढून टाकत काश्मीर भारताशी जोडून टाकले. ५६ इंचाची छाती असलेल्या मोदी यांनीच ते कलम रद्द करून टाकले. ते लोकांना आवडले आहे, पण शरद पवार विचारतात, हे कलम का हटवले? त्यांना काय अडचण आहे, हेच समजत नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादीवाले प्रचाराला येतील त्यावेळी त्यांना, तुम्ही ३७० च्या विरोधात आहात की बाजूने आहात, हे विचारा.

@@AUTHORINFO_V1@@