आनंदाची बातमी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीती कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |


 

जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे काल दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किमतीत अनुक्रमे १२ आणि ११ पैशांनी, तर डिझेलच्या किमतीतही अनुक्रमे १५ आणि १६ पैशांनी कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे प्रवाशांना खूपच आनंद होणार आहे.

इंडियन ऑईल वेबसाइटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोल दर अनुक्रमे ७३.४२पैसे प्रति लिटर, ७६.०७ पैसे प्रति लिटर, ७९.०३ पैसे प्रति लिटर आणि ७६.२५ पैसे प्रति लिटर असे राहिले आहेत. तर मेट्रो सिटीजमध्ये डिझेलच्या किमतीत देखील मोठी घसरण पाहायला मिळत आहे. साधारण ३० सप्टेंबरनंतर पेट्रोलच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात देखील पेट्रोलच्या किमती थोड्या कमी झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला होता. आता आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झाल्याने प्रवासी खुश झाले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@