मोदींना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजीव भट्टचे पितळ उघडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |


गुजरात उच्च न्यायालयाने दिला दणका: शिक्षा रद्द करण्यास नकार

कोण आहेत संजीव भट्ट?

संजीव भट्ट गुजरात मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. मोदींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात संजीव भट्ट यांनी भूमिका बजावली होती, अस म्हणतात. मोदींची प्रतिमा मलीन करण्यासाठी संजीव भट्ट यांनीं अनेक जाहीर वक्तव्ये केली होती. सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास संजीव भट्ट यांनी तयारी दर्शविली होती.संजीव भट्ट यांच्या अखत्यारीत आरोपीचा कोठडीत मृत्य झाल्याचा आरोप आहे. मध्यंतरी युपीए सरकारच्या काळात राजकीय अभय लाभल्यामुळे या प्रकरणांची चौकशी दाबली गेली होती.

 

काय आहे प्रकरण ?

 

संजीव भट्ट यांच्यावर कोठडीत एका व्यक्तीला मारून टाकल्याचा आरोप आहे. संजीव भट्ट यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. त्यांना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा जामनगर न्यायालयाने सुनावली आहे. संजीव भट्ट जाम-जोधपुर पोलीस ठाण्यात गस्त अधिकारी होते. ३० ऑक्टोबर १९९० रोजी भट्ट ने काही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. विहिप च्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारझोड व अतोनात शारीरिक कष्ट देण्यात आले. हा सर्व प्रकार संजीव भट्ट यांच्या देखरेखीत घडला होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर संजीव भट्ट यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. संजीव भट्ट यांनी न्यायालयाच्या आदेशाविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपील केले आहे. अपिलावरील निर्णय होईपर्यंत शिक्षा रद्द करण्यात यावी अशी विनाणती संजीव भट्ट यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली होती.

गुजरात न्यायालयाने काय म्हटलंय ?

संजीव भट्ट यांनी न्यायालयाला फसविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच संजीव भट्ट हे न्यायालयाचा पुरेसा आदर करीत नाहीत असेही गुजरात उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.

संबंधित निकाल दिनांक १० ऑक्टोबर २०१९ रोजी देण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@