रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |



ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार
आज जाहीर करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी सांगलीत विष्णुदास भावे गौरवपदकाची घोषणा केली. ५ नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

दरम्यान, यावर्षीचा हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना ५ नोव्हेंबरला प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप गौरव पदक, २५ हजार रुपये रोख असे असून यंदा देखील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रोहिणी हट्टंगडी यांनी आत्तापर्यंत मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये, गाजलेल्या मालिकांमध्ये, सुप्रसिद्ध नाटकांमध्ये आपल्या कलेचे योगदान दिले आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद देखील दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@