भारत- चीन चर्चेतून ‘काश्मीर’मुद्दा आऊट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |



चेन्नई
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान चीनमार्फत भारतावर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनीही शी जिनपिंगच्या यांच्या भारतदौऱ्यापूर्वी चीनला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने आपल्या माध्यमांना सांगितले होते की, जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चीन भारताशी चर्चा करेल आणि परिस्थिती पूर्वस्थितीवर आणण्यासाठी दबाव आणेल. पण चीनने जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानच्या प्रयत्नांनंतरही कोणतीही चर्चा केली नाही.



परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले की,"दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी सुमारे ९० मिनिटे चर्चा केली. ज्यामध्ये संरक्षण
, व्यापार, गुंतवणूक, कैलास मानसरोवर यात्रा, आयटी आणि फार्मास्युटिकल क्षेत्र या दोन देशांमध्ये चर्चा झाली.दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि सेवा या परस्पर बाबींवर कार्य करण्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार केली जाईल. ज्यामध्ये चीनमधील हू चुंचुआ आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांच्या लोकांमध्ये परस्पर समन्वयावर भर दिला जाईल. मानसरोवरच्या प्रवाशांची संख्या वाढविणे व त्यांच्या सुविधांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी याबाबत बरेच बदल सुचवले."




तत्पूर्वी
, पीएम मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ताज फिशरमॅन हॉटेलमध्ये हातमाग आणि कृत्रिम वस्तूंच्या प्रदर्शनात उपस्थित होते. येथे पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना रेशमी कपड्यावर विणलेले छायाचित्र भेट केले . नेपाळच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतात त्यांना मिळालेल्या सन्मानाने आपण भारावून गेलो आहोत, असे म्हणाले. महाबलीपुरममध्ये दोन्ही देशांमधील शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेच्या उद्घाटन करताना जिनपिंग म्हणाले की, "भारताच्या पाहुणचाराने भारावलोय. हा कायम स्वरुपी स्मरणात राहणारा अनुभव आहे. चीनमधील माध्यमांनी दोन्ही देशांच्या संबंधांवर चांगले वृत्त दिले आहे, असं जिनपिंग म्हणाले. भारत-चीनमधील द्वीपक्षीय संबंध सुधारणेचं श्रेय जिनपिंग यांनी यावेळी मोदींना दिलं. शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना चीनमधील पुढील शिखर परिषदेसाठी चीनला येण्याचे आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी हे आमंत्रण स्वीकारले असून याची तारीख निश्चित करण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@