‘लिंचिंग’चेच लिंचिंग केले पाहिजे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019   
Total Views |




सर्वच बाबतीत परकीयांचे उष्टे चाटणे हा पुरोगामी स्वभाव असतो. पुरोगामी हा सेक्युलर असल्यामुळे ‘चाटुगिरी’ करणे हे त्यांचे लक्षण झालेले आहे. अमेरिकेच्या ‘लिंचिंग’चा मोठा इतिहास आहे. वर जे पुस्तक दिले आहे, त्या पुस्तकातील घटना आणि प्रसंग वाचणे अवघड आहे. एका झाडावर एका वेळी आठ-दहा जणांना लटकलेले पाहाताना आपला जीव कासावीस होतो-तसे ते आपले कोणीही नसताना. म्हणून जे ‘लिंचिंग’ हा शब्दप्रयोग भारतीय घटनांच्या संदर्भात वापरतात त्यांचे आपण वेगळ्या अर्थाने ‘लिंचिंग’ केले पाहिजे. त्यांना झाडावर लटकवणे, असा त्याचा अर्थ नव्हे. त्यांचे विचार, त्यांची मानसिकता, त्यांची कलहवृत्ती, त्यांची विकृतता या सर्वांचेच ‘लिंचिंग’ केले पाहिजे. त्यांच्या वटवटीचे मार्केट जेवढ्या लवकर आपण उद्ध्वस्त करू तेवढ्या लवकर ही ‘लिंचिंग’ मानसिकता रसातळाला जाईल.



सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीच्या उत्सवात भाषण झाले. गेली काही वर्षे विजयादशमीचे सरसंघचालकांचे भाषण दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित केले जाते. लोकं आपल्या घरी बसून हे भाषण ऐकतात. यापूर्वी म्हणजे सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी सरसंघचालकांच्या विजयादशमी भाषणाला कोणी फारशी प्रसिद्धी देत नसे. त्याहीपेक्षा मागे गेले आणि ३०-४० वर्षांपूर्वीचा कालखंड आठवला, तर वर्तमानपत्राच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणाची बातमी येई. काळ झपाट्याने बदलत चाललेला आहे. लोकमतही बदलत चाललेले आहे. संघाची गंभीर दखल घेतल्याशिवाय माध्यमं चालविणे आता शक्य नाही. सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण सार्वजनिक असते. त्यामुळे या भाषणावर उलट-सुलट चर्चा अपेक्षित धरली पाहिजे. हा काही संघस्वयंसेवकांपुढील बौद्धिक वर्ग नव्हे. ते जाहीर भाषण आहे. सरसंघचालक काय बोलले, काय नाही बोलले आणि जे बोलले त्याचे विकृत अर्थ कसे करायचे, याबाबतीत प्रसिद्धीमाध्यमातील अनेकांची डोकी भन्नाट वेगाने धावतात. आपल्या भाषणात सरसंघचालकांनी ‘लिंचिंग’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेऊन काही भाषण केले. ते ऐकत असतानाच हा शब्द घेऊन आता उद्या उलट-सुलट चर्चा सुरू होणार हे लक्षात आले. सरसंघचालक काय म्हणाले, हे त्यांच्याच शब्दात प्रथम बघूया. “आजकाल आपल्याच समाजातील एका समुदायाकडून दुसर्‍या समुदायातील व्यक्तींवर आक्रमण करून त्यांची सामूहिक हिंसा केली जात असल्याच्या बातम्या छापल्या जात आहेत...”



“यातील काही घटना या जाणूनबुजून घडविल्या जातात, तर काही घटनांचा विपर्यास करून त्या प्रकाशित केल्या जातात...” “कायदा आणि सुव्यवस्थेच्या मर्यादांचे उल्लंघन करणार्‍या हिंसक प्रवृत्ती समाजातील परस्पर संबंध नष्ट करण्याचे काम करतात...” “कितीही मतभेद होवोत, कितीही प्रक्षोभककृती असो, कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून, पोलिसांकडे ही प्रकरणे सोपवून, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागेल...”




“भारताच्या परंपरेमध्ये न बसणार्‍या अशा घटनांना ‘लिंचिंग’सारखी उपाधी देऊन संपूर्ण देशास आणि हिंदू समाजास सर्वत्र बदनाम करण्याचा जो प्रयत्न होताना दिसत आहे, तसेच देशातील तथाकथिक अल्पसंख्याक समाजामध्ये भय निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे, अशा प्रकारची जी षड्यंत्रे चालत आहेत, ती आम्ही लक्षात घेतली पाहिजेत. भडक भाषा तसेच भडकवणारी कृती यापासून आम्ही दूर राहिले पाहिजे. विशिष्ट समुदायाची वकिली करण्याच्या आड परस्परांमध्ये भांडणे लावून स्वार्थाची भाकरी भाजणार्‍या तथाकथित नेत्यांच्या कच्छपि आपण लागता नये. अशा घटनांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी आपल्या देशात पुरेसे कायदे विद्यमान आहेत. त्या कायद्यांची प्रामाणिकपणे व सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे.” डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणातील काही ठळक वाक्ये फक्त दिलेली आहेत. तथाकथित गोभक्त मुस्लीम समाजाला लक्ष करून, कायदा हातात घेऊन त्यांना ठार मारतात. अखलाख मोहम्मद याची हत्या अशाप्रकारे झाली. तिचे प्रचंड भांडवल करण्यात आले. त्यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण असे की, भांडवल करणार्‍यांची अपेक्षा भाजपचे सरकार दिल्लीत येईल, अशी नव्हती. ते आले. मग या सरकारला बदनाम करण्याची त्यांनी विषयसूची ठरविली. हे सरकार अल्पसंख्याकविरोधी आहे, दलितविरोधी आहे, स्त्रीविरोधी आहे, हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा देशाला घातक आहे, तो हिंसक आहे आणि देशाला मध्ययुगात घेऊन जाणारा आहे, अशी मांडणी त्यांनी सुरू केली. एकाच वेळी भाजपची आणि हिंदू समाजाची बदनामी त्यांचा विषय झाला.




आपला देश खूप मोठा आहे
. लोकसंख्या खूप मोठी आहे, अनेक प्रकारच्या रुढी-परंपरा समाजात घट्ट बसल्या आहेत. केवळ कायदा करून त्यात बदल होत नाहीत. बदल करण्यासाठी लोकमानस बदलावेलागते. एवढ्या मोठ्या समाजात काही ठिकाणी तणाव निर्माण होतात आणि हिंसक घटना घडतात. हुंडाबळीसारख्या घटनाही घटतात. भाजपचे सरकार आल्यामुळे या घटना घडतात, असे नसून काँग्रेसच्या राज्यातही या घटना घडत होत्या आणि इंग्रजांच्या राज्यातही या घटना घडतच होत्या. शहाणा माणूस त्याचा असा विचार करेल की, अशा घटना घडू नये म्हणून आपल्याला समाजाचे व्यापक प्रबोधन केले पाहिजे. चित्रपट, माहितीपट, नाटक, नाटिका, नुक्कड शो, पथनाट्य, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून समाजप्रबोधन केले पाहिजे. हा झाला भावात्मक कार्यक्रम. भावात्मकता हा शब्द तथाकथित पुरोगामी सेक्युलॅरिस्ट, तथाकथिक मानवतावादी यांच्या शब्दकोशात नसतो. ते ‘विषयभांडवलवादी’ असतात. म्हणजे, विषयाचे भांडवल कसे करायचे यातच त्यांची बुद्धी चालते. त्यांनी म्हणायला सुरुवात केली की, हिंदू समाजात ‘लिंचिंग’च्या घटना घडतात तरीही भागवत नाही कसे म्हणतात? ते मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेतयातील किती जणांना ‘लिंचिंग’ म्हणजे काय? हे माहीत असतं, हे सांगता येत नाही. ‘लिंचिंग’ हा इंग्रजी शब्द आहे. परंतु, तो इंग्रजांच्या इंग्रजीत नसून अमेरिकेच्या इंग्रजीत आहे. चार्ल्स लिंच हे अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धातील एक मोठे अधिकारी होते. १८८२ साली त्यांनी स्वातंत्र्य युद्धाला विरोध करणार्‍या संशयितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या. यामध्ये चाबकाने फटके मारणे, संपत्ती जप्त करणे, एकनिष्ठतेची शपथ बळजबरीने लिहून घेणे, सक्तीने सैन्यात भरती करणे इत्यादी गोष्टी त्यांनी केल्या. यातल्या बहुतेक सर्व बेकायदेशीर होत्या. १८८२ साली व्हर्जेनिया जनरल असेम्बलीने (कायदेमंडळाने) त्याला कायदेशीर दर्जा दिला. ‘लिंचचे कायदे’ म्हणून ते प्रसिद्ध झाले आणि या कायद्याप्रमाणे जे वागले त्यांनी ‘लिंचिंग’ केले, असे म्हटले जाऊ लागले.



आता या शब्दाच्या अर्थाविषयी
. डिक्शनरीत त्याचा अर्थ असा दिला आहे की, ‘एखाद्याचा अपराध कायद्याने प्रमाणित झाला नसतानादेखील त्याला किंवा त्यांना दोरखंडाने झाडावर फासावर लटकवून समूहाद्वारे त्याचा प्राण घेणे.’ या व्याख्येत-

) झाडावर लटकावून प्राण घेणे.

) प्राण घेण्याची कृती समूहाने करणे.

) तो अपराधी आहे की नाही याची फारशी फिकीर न करणे.

) कायद्याची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करणे.

) कायदा आपल्या हातात घेणे.

एवढ्या सगळ्या गोष्टी जिथे घडतात त्याला ‘लिंचिंग’ असे म्हणतात. आता अशाप्रकारचे लिंचिंग भारतात कोठे झाले? ते होणे शक्य आहे का? याचा विचार ज्याचा त्यांनी केला पाहिजे. हिंदू माणूस एखादी मुंगी मारतानादेखील दहावेळा विचार करतो. माणसाला मारण्याची कृती तीसुद्धा समूहरूपाने करणे आणि त्याचा आनंद उपभोगणे हे आपल्या स्वभावात बसत नाही.



अमेरिकन माणसाच्या स्वभावात ते पूर्णपणे बसतं
. अमेरिकेतल्या ‘लिंचिंग’च्या प्रकाराची माहिती देणारं ‘Thirty years of lynching in the United States, १८८९-१९८१’ पुस्तक आहे. हे पुस्तक ‘National Association for the Advancement of Colored People [NAACP]’ प्रसिद्ध केलेले आहे. १८६३ साली अब्राहम लिंकनने निग्रो गुलामांना गुलामीतून मुक्त केले. त्यांना नागरिकत्वाचे अधिकार दिले. दक्षिणेतील गोर्‍यांना ते नको होते म्हणून तेथील राज्यांनी मुक्त झालेल्या गुलामांना विविध कायद्यांनी बांधून टाकले. त्यांच्याविरुद्ध अन्याय आणि अत्याचार सुरू केले. या अत्याचाराचा एक प्रकार ‘लिंचिंग’ असा आहे. हे पुस्तक माहिती देतं की, १८८९ ते १९१८ या ३० वर्षांत ३ हजार २२४ व्यक्तींना ‘लिंचिंग’द्वारे ठार करण्यात आले. त्यातील ७०२ गोरे होते. गोर्‍या लोकांमध्ये ११ गोर्‍या महिला होत्या. निग्रोंमध्ये ५० महिला होत्या. टक्केवारीत सांगायचे तर ‘लिंचिंग’ झाले अशा निग्रोंची टक्केवारी ७८.२ टक्के आहे. ‘लिंचिंग’ बघायला शेकड्याने लोकं उपस्थित राहत असत. ज्याला झाडावर टांगले आहे त्याच्या मरतानाचा आनंद ते घेत असत. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये गिलोटिन खाली २५ ते ३० हजार जणांची डोकी उडविली गेली. हा डोकी उडविण्याचा ‘समारंभ’ बघण्यासाठी फ्रान्समध्येदेखील शेकडो लोक एकत्र येत. फ्रान्सच्या घटनेला ‘लिंचिंग’ कोणी म्हटले नाही, पण प्रवृत्ती दोन्ही ठिकाणी सारखीच.






ही प्रवृत्ती भारतात राहाणार्‍या भारतीय माणसाची आहे का? मग तो मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, जैन असो, बौद्ध असो. समूह रूपाने कोणाची हत्या करणं हा आपला स्वभाव नाही. तरीदेखील काही घटना देशात घडतात. ‘ऑनर किलिंग’च्या नावाने आंतरजातीय विवाह करणार्‍यांना ठार मारलं जातं. हे काम योग्य झाले असे त्यांच्या जातीतील लोकंदेखील म्हणत नाही, बाकीच्यांची गोष्ट सोडा. समाजाच्या दृष्टीने ते अपराधीच असतात. आपला स्वभाव जाहीरपणे एकमेकांविरुद्ध तोंडाला येईल ते बडबड करण्याचा आहे. ‘बघून घेऊ’, ‘ठीक करू’, ‘आमची सत्ता आली असता दाखवू...’ वगैरे... त्याच्या पलीकडे कोणी जात नाही. ही भाषादेखील सामान्य माणसाला आवडत नाही आणि आता लोकं अशी भाषा वापरणार्‍यांना घरी बसवायला लागलेले आहेत. सर्वच बाबतीत परकीयांचे उष्टे चाटणे हा पुरोगामी स्वभाव असतो. पुरोगामी हा सेक्युलर असल्यामुळे ‘चाटुगिरी’ करणे हे त्यांचे लक्षण झालेले आहे. अमेरिकेच्या ‘लिंचिंग’चा मोठा इतिहास आहे. वर जे पुस्तक दिले आहे, त्या पुस्तकातील घटना आणि प्रसंग वाचणे अवघड आहे. एका झाडावर एका वेळी आठ-दहा जणांना लटकलेले पाहाताना आपला जीव कासावीस होतो-तसे ते आपले कोणीही नसताना. म्हणून जे ‘लिंचिंग’ हा शब्दप्रयोग भारतीय घटनांच्या संदर्भात वापरतात त्यांचे आपण वेगळ्या अर्थाने ‘लिंचिंग’ केले पाहिजे. त्यांना झाडावर लटकवणे, असा त्याचा अर्थ नव्हे. त्यांचे विचार, त्यांची मानसिकता, त्यांची कलहवृत्ती, त्यांची विकृतता या सर्वांचेच ‘लिंचिंग’ केले पाहिजे. त्यांच्या वटवटीचे मार्केट जेवढ्या लवकर आपण उद्ध्वस्त करू तेवढ्या लवकर ही ‘लिंचिंग’ मानसिकता रसातळाला जाईल.

@@AUTHORINFO_V1@@