महिला मतदारांसाठी 'विशेष सखी केंद्र'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |



मुंबई
: राज्यात येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे , याकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये तरुणी व महिला यांना मतदानप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मतदान जनजागृती उपक्रम घेतले जात आहेत. असाच एक उपक्रम खास महिलांसाठी , महिलांकडून सुनियंत्रित केली जाणारी ३५२ सखी केंद्र राज्यभरात उभारली जाणार आहेत. प्रत्येक मतदार संघात किमान १ सखी मतदान केंद्र असेल.



याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते मतदान अधिकाऱ्यापर्यंत सर्वच महिला असतील. ही केंद्र केवळ महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक सहभागी व्हावं याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये कोणताही विशिष्ट रंग किंवा चिन्हे वापरली जाणार नाहीत याची काळजी घेतली जावी
, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ही केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि स्वच्छ दिसावेत याकरिता रांगोळी , सजावट यांवर भर देण्यात येईल. अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष पुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीक, अशी केंद्र उभारण्यात येतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशाच केंद्रांची सखी मतदान केंद्रांकरता विशेष निवड करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@