जनसेवेसाठी तत्पर मुख्यमंत्री : डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत मुक्त संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळणारे आणि कायम जनसेवेसाठी तत्पर असणारे गोव्याचे मुख्यमंत्री यांचा एक व्हिडिओ गेल्या काही काळात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका अपघातग्रस्त महिलेवर प्रथमोपचार करत तिला आपल्या ताफ्यातील एका गाडीने रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांच्या या तत्परतेबद्दल आणि विविध विषयांवर मुक्त संवाद दैनिक मुंबई तरुण भारत तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवारी दि. १२ ऑक्टोबर रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्याबरोबर ‘मुक्त संवादा’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सभागृह, पहिला मजला, चंचल स्मृती, जी. डी. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, वडाळा येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

@@AUTHORINFO_V1@@