बिग बॉस नको...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |


मराठी बिग बॉस च्या सीजन नंतर नुकतीच हिंदी बिग बॉस सिझन १३ ला कलर्स वाहिनीवर सुरुवात झाली. बिग बॉस हा टेलिव्हिजन शो आत्तापर्यंत अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. गाजियाबाद मधील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा सदस्य नंद किशोर गुर्जर यांनी हा कार्यक्रमाच्या प्रसारणाला विरोध दर्शवत तो बंद करण्याची मागणी करणारे पात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला उद्देशून लिहिले होते. दरम्यान यावर योग्य टी कार्यवाही करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाच्या रिपोर्टची मागणी केली आहे.

बिग बॉस च्या सगळ्याच सीझन्स मध्ये होणाऱ्या आक्षेपार्ह गोष्टींमुळे हा सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो देखील ठरला आहे. मात्र सध्या त्यामध्ये सुरु असलेल्या अश्लीलतेमुळे हा शो बंद करण्यात यावा अशी मागणी बहुतांश लोकांकडून केली जात असून ती रास्त देखील आहे. या आधीच्या बिग बॉसच्या सिझनला देखील अशाच प्रकारे विरोध करण्यात आला होता.  


दरम्यान शो सुरु होण्यापूर्वीच त्यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांवरून देखील बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉस या शो चा फॉरमॅट असा आहे ज्यामध्ये स्पर्धकांना ९० दिवस म्हणजेच ३ महिने बिग बॉस च्या घरी राहावे लागते; मग त्यांमध्ये त्यांना बिग बॉस ने घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन करावे लागते. टास्क देखील पूर्ण करावे लागतात. या सगळ्या मुद्यांना अनुसरून जो सगळ्यात शेवटी प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरतो तो जिंकतो आणि त्याला एक बक्षीस पात्र रक्कम देण्यात येते. आता या फॉरमॅटमध्ये स्पर्धक उगाचच रंजकता आणण्यासाठी भांडणे, शिवीगाळ, मतभेदांचे प्रदर्शन या सगळ्या गोष्टी करतात आणि कार्यक्रमाला टीआरपी मिळवून देतात. हे कितपत योग्य आहे याचा विचार करणे आजच्या घडीला खूपच गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@