...तर वाचली असती डॉ. नेहा शेख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |


वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. नेहा शेख (वय २५) या तरुणीचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही झालेल्या विविध अपघातांप्रकरणी सुप्रीमो कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित डॉ. नेहा शेख हिचा जीव गेला नसता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

डॉ. नेहा शेख आपल्या भावासोबत ठाण्याला लग्न सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. घरी परतत असताना खराब रस्त्यामुळे तिचा अपघात झाला. पुढील महिन्यात दि. ७ नोव्हेंबर रोजी तिचे लग्न होते. तिच्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भिवंडी-वाडा-मनोर हा महामार्ग बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर शासनाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिला आहे. हा महामार्ग संपूर्ण खराब झाला असून याआधीही या महामार्गावर अनेक अपघात होऊन कित्येक लोकांचे बळी गेले आहेत. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत करावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही काम केले जात नाही.

या निष्काळजी कंपनीविरोधात कुडूस परिसरातील स्थानिक नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करून कंपनीचा निषेध केला. संबंधित सुप्रीम कंपनी मालकावर गुन्हा दाखल केला आहे. रस्ता सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत टोल बंद राहील, असे ठोस आश्वासन पोलीस उपनिरीक्षक दोडकर यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीन तासानंतर आंदोलन मागे घेतलेया रास्ता रोको आंदोलनात सुनील पाटील, इरफान सुसे, मुस्तफा मेमण, कुडूसचे उपसरपंच गिरीश चौधरी, जितेश पाटील, सचिन पाटील, दत्तात्रेय भोईर, रामदास जाधव, स्वप्नील जाधव, शुभम जाधव, सचिन भोईर आदी हजर होते.

@@AUTHORINFO_V1@@