शांततेच्या नोबेलचा मानकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019   
Total Views |



एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचा पंतप्रधान आणि आता नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी अ
ॅबी अहमद अली यांच्याविषयी...


शांतता नोबेल पुरस्काराचे यंदाचे शंभरावे वर्ष
. या पुरस्कारासाठी एकूण ३०१ नावे सुचवण्यात आली होती. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचेही नाव यात आघाडीवर होते. मात्र, शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी पुरस्कार जाहीर झाला तो इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अ‍ॅबी अहमद अली यांना. शेजारील राष्ट्र अ‍ॅरिट्रीयाशी केलेला शांतता करार, सीमायुद्ध, विविध निर्बंधांतून देशातील नेते, नागरिक यांची मुक्तता आदी योगदानाबद्दल त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. नोबेल पुरस्काराच्या आयोजकांनी जगभरात सुरू असलेल्या सीमावादातील राष्ट्रांचे याकडे लक्ष वेधून घेतले. अ‍ॅबी अहमद यांच्या केवळ देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख पुरस्कर्त्यांद्वारे करण्यात आला. अ‍ॅबी अहमद अली यांचा जन्म १५ ऑगस्ट १९७६ साली बेशाशा या शहरात झाला. इथिओपियातील मुस्लीम ओरोमो वंशातील एका कुटुंबात ते जन्मले. अहमद अली दाम्पत्यांचा सहावा-सर्वात धाकटा मुलगा एकेकाळी देशाचा पंतप्रधान होईल आणि जागतिक स्तरावर शांततेचा पुरस्कार मिळवेल, अशी कल्पना त्याकाळी त्यांनी केलीही नसेल. मात्र, आई-वडिलांनी आपल्या मुलाचे नाव त्यावेळी ‘अ‍ॅबियॉट’ ठेवले होते.



'अ‍ॅबियॉट’ म्हणजे क्रांती. नावाप्रमाणे त्यांनी आपल्या कार्याची प्रचिती आज जगाला दिली. ते वर्ष होते डेर्ग क्रांती १९७४ लढ्यावरून त्यावेळी अशी नावे देण्याची पद्धत होती. अ‍ॅबियॉट यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्याच एका शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना एग्रो शहरात पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या शालेय शिक्षणातील प्रगतीबद्दल शिक्षकांनी विशेष उल्लेख केला होता - ’स्वतः अभ्यासात हुशार असणारा हा विद्यार्थी इतरांनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असे, तसेच आणखी प्रगती कशी करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करत असे.’ पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी संगणक अभियांत्रिकी शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर २०११ मध्ये ग्रीनव्हीच विद्यापीठात कला शाखेतून त्यांनीट्रान्सफॉर्मिंग लीडरशीप’ या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०१३ मध्ये अ‍ॅशलॅण्ड विद्यापीठातून ‘मास्टर्स ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ ही पदवी मिळवली. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी पीएच.डीची तयारी सुरू केली होती. २०१७ मध्ये इन्स्टिट्यूट फॉर पिस अ‍ॅण्ड सिक्युरीटी स्डडिज्, एडीस अबाबा विद्यापीठातून त्यांनी पीएच़.डी पूर्ण केली. ‘इथिओपियातील पारंपरिक संघर्ष निराकरण आणि तेथील समाजाची भूमिका’ या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. देशातील धार्मिक संघर्षाच्या प्रतिबिंबावरील हा प्रबंध एका विशेष जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. झिनाश टायच्यु यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पती-पत्नी दोघेही इथिओपियन सैन्यदलात कार्यरत होते. त्यांना तीन मुली आणि एक दत्तक मुलगाही आहे. वैयक्तिक आयुष्यात ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देतात. इतरांनाही आरोग्यदायी जीवन जगण्याची प्रेरणा ते देतात. विद्यार्थीदशेत असताना महाविद्यालयात त्यांनी फिटनेस चळवळ उभी केली होती.



१९९१ मध्ये मोठा भाऊ हुतात्मा झाल्यानंतर त्यांनी इथिओपियन सैन्यदलातील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली
. ओमरो डेमोक्रेटिक पक्षाचे सभासदही ते झाले होते. सैन्यदलातील प्रशिक्षणानंतर इथिओपियन राष्ट्रीय संरक्षण दलात रुजू झाले. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांची बदली ‘इंटलिजन्स कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट’मध्ये झाली. त्यावेळी ‘युनायटेड नेशन्स पिस किपिंग फोर्स’च्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. १९९८ ते २००० दरम्यान इथिओ-अ‍ॅरिट्रीया युद्धात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती त्यांच्या मूळगावी करण्यात आली होती. त्या काळी त्यांच्या समोर देशातील ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण झाल्यामुळे होणारा नरसंहार थांबवण्याचे आव्हान होते. हे आव्हान लिलीया पेलल्यानंतर दोन्ही धर्मातील मध्यस्त म्हणून त्यांना पाहिले जाऊ लागले. २००८ मध्ये स्थापन झालेल्या ‘इथिओपियन इन्फर्मेशन नेटवर्क सिक्युरिटी एजन्सी’चे ते सहसंस्थापक होते. दरम्यानच्या काळात त्यांनी या संस्थेच्या विविध जबाबदार्‍या सांभाळल्या होत्या. यासोबतच त्यांचा राजकीय प्रवासही सुरूच होता. २०१० च्या निवडणुकीत ते खासदार झाले. संरक्षण क्षेत्राप्रमाणेच राजकीय कारकिर्दही त्यांनी गाजवली. अनेक वर्षे महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत राहिले. २ एप्रिल, २०१८ मध्ये ते इथिओपियाचे पंतप्रधान झाले. एकता दृढता, शांतता करार, सीमाप्रश्न आदी अनेक मुद्दे त्यांनी यशस्वीपणे हाताळले. आर्थिक विकासाच्या दृष्टीने पावले टाकताना व्यापाराची अनेक कवाडे खुली केली. हवाई वाहतूक, ऊर्जा, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये खासगी व्यापाराला चालना दिली. हॉटेल्स, उत्पादन, रेल्वे वाहतूक अशा अनेक क्षेत्रांना उभारी दिली. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता शांतीचा चेहरा म्हणूनही ओळखले जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@