विमानपूजन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |
 
 
 
खरंच चुकलंच राजनाथसिंहांचं! तलवारी म्यान झाल्यात, धनुष्यबाण अर्थहीन ठरलेत, अग्नीपासून जलापर्यंत अन् वायूपासून भस्मापर्यंतची सारी शस्त्रास्त्रे ग्लान्त झाली असताना, या अत्याधुनिक युगात थेट विमानाची पूजा करायला निघाले देशाचे संरक्षणमंत्री! गंध, फुलं, अक्षता घेऊन फ्रान्सच्या वारीला निघालेत ते. देशाच्या संरक्षणदलात दाखल होऊ घातलेल्या र्रोंेल विमानांची विधिवत पूजा केली त्यांनी. छे! छे! चुकलंच संरक्षणमंत्र्याचं! असे करणे, या देशातल्या कॉंग्रेस धुरीणांच्या पसंतीस पडणार नाही, याचीतरी जाणीव बाळगायला हवी होती ना त्यांनी! पण नाही. कुणाचीच पर्वा न करता भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून देण्याचा घाट घातला. केवढा पोटशूळ उठला इथल्या दीडशहाण्यांना! दूरदूरपर्यंत या कृतीची चर्चा झाली. तमाशा म्हणून संबोधन काय, नौटंकी म्हणून हिणवणी काय, प्रतिगामित्वाचा ठपका काय, काय काय थेरं चालली आहेत या पूजेवर तुटून पडणार्यांची. जणूकाय देशाची पत घालवण्याचे पातकच घडलेय् राज्यकर्त्यांच्या हातून. चांद्रयान मोहीम अपयशी ठरली म्हणून इस्रोच्या प्रमुखांना भावनावेग आवरता न येण्याचीही खिल्ली उडवायची आणि संरक्षणमंत्र्यांनी सैन्यदलात दाखल होऊ घातलेल्या लढाऊ विमानाची पूजा करण्याच्या कृतीचाही उपहास करायचा, हीच यांच्या पुरोगामित्वाची ओळख.
जगाच्या पाठीवर विविध भूखंडात राहणार्या मानवी समूहाची जगण्याची, वागण्याची, राहण्याची स्वत:ची एक परंपरा आहे. एक संस्कृती आहे. तीच त्याची ओळखही आहे. भूतानसारख्या देशात नखशिखान्त कपडे घालण्याची पद्धत आहे, तर पश्चिमेकडे तोकड्या कपड्यांची. तिकडे शॅम्पेन उडवून विजय, आनंद साजरा करण्याची तर्हा आहे, तर आपल्याकडे ओवाळून, तोंड गोड करून आनंद साजरा करण्याची रीत आहे. पद्धतीतले भेद तेवढे वगळले तरी क्षण ‘साजरा’ करण्याची भावना सर्वदूर सारखीच. दोन्ही आपापल्या ठिकाणी योग्य मानायला हरकत नाही. पण, त्यांचं तेवढं चांगलं, आधुनिक, योग्य अन् आपलंच तेवढं टाकाऊ, असे मानण्याची भिकार परंपरा कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेल्या काही शहाण्यांनी मागील कालावधीत इथे जाणीवपूर्वक निर्माण केली आणि रुजवलीही.
 
 
 
र्रोंफेल पूजनावरून सुरू झालेला थयथयाट हा त्याचाच परिपाक आहे. उर्वरित जगाने अनुसरलेली रीत स्वीकारार्ह ठरवून, स्वत:च्या संस्कृतीतील फक्त खाचखळगे शोधत राहण्याची सवय इथल्या काही लोकांना जडली आहे. विशेषत: हिंदू पूजा, पद्धतीत तर त्यांना सारेच वावगे दिसते. तरी बरं, कॉंग्रेस सत्तेत असताना त्यांच्या कुठल्याच सार्वजनिक उपक्रमांची सुरुवात भूमिपूजन, उद्घाटनाशिवाय पार पडली नाही. त्या प्रक्रियेत नारळ फोडण्यास, कुदळ मारण्यास कधी कुणी नकार दिला नाही. कित्येक शहाणे घरी नवीन गाडी विकत घेताच आधी मंदिरात पोहोचतात. तिथे गाडीची पूजा करवून घेतात. नवीन घर विकत घेतल्यावर विधिवत पूजनाविना त्यांचा वास्तुप्रवेश होत नाही. त्या वेळी ना विज्ञान आडवे येत, ना त्यांचा कथित आधुनिक विचार. पण, इतरांनी घरात कुठलीशी पूजा आयोजित केली की मग मात्र बिथरतात बिचारे!
 
 
 
 
आता हेच बघा ना, राजनाथसिंहांनी, सैन्यदलात दाखल होऊ घातलेल्या ताफ्यातील पहिल्या विमानाची पूजा करताच केवढा गोंधळ घातलाय् तमाम जनांनी. कॉंग्रेस काय, डावे काय, उजव्यातले स्वयंघोषित डावे काय, सारे सरसावलेत शहाणपणा शिकवायला. टीकेची झोड उठवायला. विज्ञानयुगात असली पूजा म्हणजे मागासलेपण आहे, असे म्हणणार्यांपासून तर विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्याच्या कृतीची खिल्ली उडवणार्यांपर्यंत सारेच या मोर्चात सहभागी झाले आहेत. मुळात इथे मुद्दा हा आहे की, विज्ञानाची कास धरणे म्हणजे माणुसकी अन् भावना पायदळी तुडवणे असते का? दिवसागणिक राबराब राबून तयार केलेला एखादा प्रकल्प यशस्वी झाला नाही, तर डोळेदेखील पाणावू नयेत, इस्रोच्या प्रमुखांचे? विजयादशमीला शस्त्रांंचे पूजन करणे, ही भारतीय परंपरा आहे. र्रोंेलचे विमान हे एका अर्थाने भारतीय सैन्यदलासाठीचे अत्याधुनिक शस्त्रच आहे. लढण्यासाठीचे एक साधन असणार आहे. दसर्याच्या मुहूर्तावर त्याची पूजा करण्याच्या कृतीसाठी हे लोक, त्यांना मागास ठरवायला निघाले आहेत, ज्यांनी विज्ञानाची कास धरत या आधुनिक विमानांचा स्वीकार केलाय्. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रतीक असलेले लढाऊ विमान सैन्यदलात सहभागी करणार्यांनी केवळ हळद, कुंकू वाहून त्यांची पूजा केली म्हणून त्यांची खिल्ली उडवायला निघालेल्यांना, अंधश्रद्धा आणि यश-विजयाची कामना करीत केलेला विधिवत शुभारंभ यातील भेद कळत नाही, एवढाच याचा अन्वयार्थ.
 
 
 
एखाद्या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली काय नि फीत कापून केली काय, फरक काहीच पडत नाही. मुळात भेद आपल्या मानसिकतेत दडला आहे. जर दीप प्रज्वलन प्रतिगामित्वाचे प्रतीक ठरत असेल, तर मग फीत कापण्याची तरी गरज कुठे असते? काहीही न करता थेट सुरुवात करण्याचा मार्गही पत्करला जाऊ शकतो ना? पण, यातील एखादीतरी गोष्ट करून सुरुवात करण्याचा अट्टहास, हा संस्कारांचा परिपाक आहे. कुठलीही योजना, उपक्रमाची सुरुवात थाटामाटात, विधिवत व्हावी अशी मनीषा बाळगणे, हादेखील संस्कारांचाच भाग आहे. पण डाव्या विचारांची, पाश्चिमात्यांची कास धरता धरता फरफट झालेल्या भारतीय समाजाची गोची अशी काही झाली आहे की, त्याला ना धड विज्ञानाची कास धरवत, ना पूर्णपणे निरिश्वरवादी होता येत. बरं, आधुनिकतेची परिभाषा, कसोटीही दिवसागणिक, माणसागणिक बदलत चालली आहे. राजनाथसिंहांनी फ्रान्समध्ये नेमके काय केले असते म्हणजे समाधान झाले असते, कॉंग्रेस आणि डाव्यांचे? हळद-कुंकू वाहण्याऐवजी फीत कापायला हवी होती, की नारळ फोडण्याऐवजी शॅम्पेनची बॉटल उघडायला हवी होती त्यांनी?
 
 
 
 
खरंच, संरक्षणमंत्र्यांनी केलेली पूजनाची कृती मल्लिकार्जुन खरगे म्हणतात तसा तमाशा होता? सारे जग कुतूहलाने आमच्याकडे बघताहे, जगावेगळी संस्कृती म्हणून त्याची नोंद घेताहे आणि आमच्यातल्या काही दिवट्यांमध्ये मात्र, राजनाथसिंहांना प्रतिगाम्यांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याची अहमहमिका लागली आहे. स्वत:च्या कुठल्याही शुभकार्याची सुरुवात मुहूर्त पाहून करणारी, निवडणुकीचा अर्ज दाखल करताना राहुकाळाची आवर्जून नोंद घेणारी, ज्योतिषाने मांडलेल्या कुंडलीतून पोराच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारी, निवडणुकीतील यशासाठी ज्योतिषाने सांगितलेली पूजा आवर्जून करणारी, इतकेच काय, स्वत:च्या पक्षाचे चिन्हदेखील एका मठाधीशाच्या ‘हाताचे’ प्रतीक असल्याचे मान्य करणारी मंडळी विज्ञानाचा स्वीकार करण्याचा दावा करीत, संरक्षणमंत्र्यांच्या कृतीला विरोध करण्याचे राजकारण करते, तेव्हा तोच तमाशा असतो खरं तर!
 
 
 
आपल्या देशात स्वत:चे पुढारलेपण सिद्ध करण्याची शर्यत लागली आहे काही लोकांमध्ये. जो भारतीय संस्कृतीला अधिकाधिक शिव्याशाप देईल तो सर्वात पुढारलेला, एवढाच एक निकष त्यासाठी निर्धारित असल्याने, दहशतवादाचा फक्त भगवाच रंग दिसला त्यांना आजवर. त्याचा हिरवा रंग तर ध्यानातही आला नाही कधीच कुणाच्या. जामा मशिदीतून जारी होणारे फतवेही दुर्लक्षित राहिलेत. प्रभूने मायेनं छत्राखाली धरलं की आजारपण दूर होत असल्याचा दावाही त्यांनी अंधश्रद्धेच्या कक्षात येऊ दिला नाही कधी. हो! पण, र्रोंफेल विमानाची विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेली पूजा मात्र अंधश्रद्धा ठरवली लेकांनी!
@@AUTHORINFO_V1@@