शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |


 


ओस्लो : इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना यंदाचा शांततेतील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. एकता, सहकार्य आणि सहकाराच्या कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शेजारी राष्ट्र एरिट्रीयासह सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 




 

 

१९०१ ते २०१८ पर्यंत एकूण ९९ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. दरम्यान आत्तापर्यंत एकूण १३३ संस्था आणि विविध व्यक्ती यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, १९ वेळा या पुरस्काराची घोषणा झालेली नाही. नोबेल पुरस्काराने एकूण १७ महिला, ८९ पुरुष व २७ संघटनांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.





या पुरस्कारासाठी ग्रेटा थनबर्गचेही नाव सुचवण्यात आले होते. तसेच एकूण ३०१ नावेही सुचवण्यात आली होती. त्यात २२३ व्यक्ती आणि ७८ संस्थांच्या नावाचाही सामावेश होता. मात्र, हा पुरस्कार अॅबी अहमेद अली यांना जाहीर झाला. त्यांच्या पुढाकारामुळे एरिट्रीयासह झालेल्या करारामुळे गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अनेक निर्बंध हटवले. तुरुंगात डांबून ठेवलेल्या अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांची त्यांनी मुक्तता केली. 




@@AUTHORINFO_V1@@