संघ स्वयंसेवकांसह कुटूंबियांची निघृण हत्या : सीबीआय चौकशीची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |


बंगालच्या मुर्शिदाबाद येथील धक्कादायक प्रकार



मुर्शिदाबाद : विजयादशमी उत्सवानिमित्त घरात उत्सव सुरू असतानाच रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकासह त्यांची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंधु प्रकाश पाल, असे त्यांचे नाव असून ते पेशाने शिक्षक होते. पोलीसांना घटनास्थळी धारदार शस्त्र आढळले आहेत. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. घटनास्थळाहून हत्येनंतर एक तरुण पसार झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.




 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे पश्चिम बंगालच्या सागरदिघी जिल्ह्यातील निवासी बंधू प्रकाश पाल हे १७ क्रमांक साहापूरच्या प्रार्थमिक विद्यालयात शिक्षक होते. गेल्या आठ वर्षांपासून ते त्यांची पत्नी ब्युटी मंडल आणि त्यांचा मुलगा बंधु अंगन पाल या आपल्या कुटूंबासह जियागंज येथील लेबूतला येथे राहत होते. विजयादशमीच्या दिवशी प्रकाश बाजारातून घरी आले होते. दुपारी त्यांच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी एक तरुण घरातून धावत बाहेर येताना त्यांना दिसला. घरात गेल्यावर दिसलेले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.







@@AUTHORINFO_V1@@