राज्याचा विकास केवळ भाजप व महायुतीच्या सरकारमुळेच : जे. पी. नड्डा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |



नाशिक : “महाराष्ट्रात स्थिर सरकार नसल्याने आजवर केवळ सत्तेची संगीतखुर्ची सुरू होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने वसंतराव नाईक यांच्यानंतर पहिल्यांदाच स्थिर सरकार मिळाले. राज्याचा विकास हा केवळ भाजप आणि महायुतीच्याच सरकारमुळे होणार आहे,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. ते भाजपतर्फे आयोजित कार्यकर्ता संमेलनावेळी बोलत होते.


जे
. पी. नड्डा म्हणाले की, “महाराष्ट्र हे सर्वात प्रगत राज्य असूनही बरेच वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले होते. फडणवीस सरकारच्या काळात समाजातील सर्वच घटकांचा विकास झाला आहे.” राज्याच्या सत्तेला फडणवीस यांच्यामुळेच स्थिरत्व प्राप्त झाले असल्याचे नड्डा यांनी यावेळी सांगितले. कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरमधील समाजातील शेवटचा घटकदेखील आता तेथील प्रशासकीय सेवेत दाखल होऊ शकणार असल्याचे नड्डा यांनी यावेळी सांगितले.


यावेळी खा
. डॉ. भारती पवार, नाशिक मध्यच्या उमेदवार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले, भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, महापौर रंजना भानसी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, भाजपचे वसंत गीते, विजय साने, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, युवा मोर्चाचे अ‍ॅड. अजिंक्य साने, महिला आघाडीच्या रोहिणी नायडू यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


उमेदवार अ
‍ॅड. राहुल ढिकले म्हणाले की, “नाशिकच्या प्रगतीसाठी भाजपशिवाय पर्याय नाही. भाजपच्या कामांमुळे समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळाला, हे लाभार्थींशी चर्चा केल्यावर समजते.” उमेदवार सीमा हिरे म्हणाल्या की, “केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावर लोकांचा विश्वास असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित आहे.” उमेदवार देवयानी फरांदे म्हणाल्या की, “भाजपने आजवर दमदार कामगिरी केली आहे. भाजपने मागील पाच वर्षांत मातृवंदना, उज्ज्वल योजना अशा अनेक प्रकारच्या उत्तम योजना देत राज्यातील महिलांचे जीवन सुकर व सुखमय केले आहे.” दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश पालवे यांनी केले.


महिला सशक्तीकरणाचे नाशिक हे उदाहरण

भाजपने महिला सशक्तीकरणास चालना दिली असल्याचे सांगतानाच नाशिकमध्ये महापौर रंजना भानसी तसेच, नाशिक पश्चिम व मध्य मतदार संघात अनुक्रमे सीमा हिरे व देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी देत भाजपने महिला सशक्तीकरणास चालना दिली असल्याचे नड्डा यावेळी म्हणाले. महिला सशक्तीकरणाचे नाशिक हे उत्तम उदाहरण असल्याचे नड्डा यांनी यावेळी प्रतिपादित केले.


मनसेला पुन्हा खिंडार

दरम्यान, नड्डा यांच्या उपस्थितीत मनसेचे शिक्षक आघाडीचे प्रकाश सोनवणे, माजी शहर अध्यक्ष मटाले, शहर उपाध्यक्ष अतुल सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा मनसेला अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या भाजप प्रवेशानंतर खिंडार पडल्याचे यावेळी दिसून आले.

@@AUTHORINFO_V1@@