नंदनवनाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली
: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दोन महिन्यांने सरकारने खोऱ्यातील पर्यटकांवरची बंदी उठवली आहे. शांततापूर्ण वातावरण पाहता राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पर्यटकांच्या आगमनावरील बंदी मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर, गुरुवारी सरकारने राज्यातील पर्यटकांच्या बंदीशी संबंधित पत्रक मागे घेण्याची अधिसूचना जारी केली.

 





दोन महिन्यांपूर्वी सरकारने एक आदेश जारी करून पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर सोडण्यास सांगितले. दरवर्षी सुमारे एक कोटी पर्यटक दरवर्षी जम्मू काश्मीर घाटीमध्ये फिरायला जातात. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी २ ऑगस्टलाच एक सल्लागार समिती स्थापन करून पर्यटकांना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविणारे पत्रक जरी केले होते. त्यानुसार पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर खोरे सोडण्यास सांगितले होते. त्यांनतर केंद्र सरकारने ५ ऑगस्टला कलम ३७० मधील तरतुदी रद्द करून जम्मू काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिला. आज या निर्णयाच्या ६५ दिवसांनी प्रशासनाने हे पत्रक मागे घेऊन काश्मीरमधील पर्यटन खुले केले. राज्यातील पर्यटन संचालक आणि ट्रॅव्हल एजंट्स यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पुन्हा एकदा पर्यटक जम्मू-काश्मीरकडे आकर्षित होतील अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@