राष्ट्रगौरवात ‘सेनाविमानन कोर’चे विशेष योगदान : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |




नाशिक
: राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवार दि. १० ऑक्टोबर रोजी ‘भारतीय सेना विमानन कोर’ला प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. ‘भारतीय सेना विमानन कोर’च्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले. गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, ले. ज. पी. एस. राजेश्वर, ले. ज. एस. के. सैनी, ले. ज. कवलकुमार, मधुलिका रावत आदी उपस्थित होते.


राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले की
, ‘’सेना विमानन कोरने गेल्या ३२ वर्षांत अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हीएशनला २७३ सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल, अशी कामगिरी या सैनिकांनी केली. त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते.” दरम्यान, आजच्या कार्यक्रमावेळी आर्मी एव्हीएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना दिली. संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडिअर सरबजीत सिंघ बावा भल्ला यांनी केले. राष्ट्रपती निशाणाला मानवंदना देण्यात आल्यानंतर कोविंद यांच्याकडून ऑफिसर कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांनी निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या समन्वय कृतीने निशाणाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी आणि आर्मी एव्हीएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलचे महत्त्वाचे योगदान


देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना जोरदारपणे करतील,” असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. देवळाली तोफखाना स्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ’रुद्रनाद’ या ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा, बिग्रेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@